Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (364.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 23/01/2023
भारतीय रिजर्व बँकेने समर्थ सहकारी बँक लिमिटेड, सोलापूर (महाराष्ट्र) वर आर्थिक दंड ठोठावला

23 जानेवारी 2023

भारतीय रिजर्व बँकेने समर्थ सहकारी बँक लिमिटेड, सोलापूर (महाराष्ट्र) वर आर्थिक दंड ठोठावला

भारतीय रिजर्व बँकेने दिनांक १६ जानेवारी २०२३ च्या आदेशाद्वारे समर्थ सहकारी बँक लिमिटेड, सोलापूर (बँक) वर भारतीय रिजर्व बँकेने, नागरी सहकारी बँकासाठी, उत्पन्नाची ओळख आणि मालमत्तेचे वर्गीकरण (आय आर ए सी) या संदर्भात जारी केलेल्या निर्देशांचे उल्लंघन / पालन न केल्याबद्दल १,५०,०००/- (केवळ एक लाख पन्नास हजार रुपये) चा दंड ठोठावला आहे. उपरोक्त निर्देशांचे पालन करण्यास बँक असमर्थ राहिली हि बाब लक्षात घेता बँकिंग नियमन कायदा, १९४९ च्या कलम ४७ ए (१) (सी) आणी सह वाचलेल्या ४६ (४) (i) व कलम ५६ मध्ये अंतर्भूत असलेल्या तरतुदीनुसार भारतीय रिजर्व बँकेद्वारे आपल्या अधिकाराचा वापर करीत हा दंड लावण्यात आला आहे.

ही कृती नियामक अनुपालनातील कमतरतांवर आधारित आहे आणि यामध्ये बँकेने तिच्या ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहारांच्या किंवा कराराच्या वैध्यतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्याचा हेतू नाही.

पार्श्वभूमी

३१ मार्च २०२० रोजीच्या आर्थिक स्थितीवर आधारित बँकेच्या तपासणी अहवालात, इतर बाबींसह, असे दिसून आले कि बँकेने काही खात्यांचे वर्गीकरण “उत्पन्नाची ओळख, संपत्तीचे वर्गीकरण आणि तरतुदीचे निकष” च्या मापदंडानुसार (आय आर ए सी) केलेले नव्हते आणि त्यात नमूद केल्याप्रमाणे तरतूद केलेली नव्हती. याच आधारे, निर्देशांचे पालन न केल्यामुळे बँकेवर दंड का लादला जाऊ नये याची कारणे दाखवा असे सूचित करणारी नोटीस बँकेला बजावण्यात आली होती.

या बाबतीत बँकेने दिलेले उत्तर आणि वैयक्तिक सुनावणीच्या वेळी बँकेने सादर केलेले तोंडी निवेदन विचारात घेता, भारतीय रिजर्व बँक या निष्कर्षावर पोहचली कि भारतीय रिजर्व बँकेच्या उत्पन्नाची ओळख, संपत्तीचे वर्गीकरण आणि तरतुदीचे निकष (आय आर ए सी) यावरील निर्देशांचे पालन न केल्याचे सिद्ध होते आणि मौद्रिक दंड लावले जाने आवश्यक आहे.

(योगेश दयाल) 
मुख्य महाप्रबंधक

प्रेस प्रकाशनी: 2022-2023/1595

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä