Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (311.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 13/02/2023
भारतीय रिझर्व्ह बँकेने दि वैद्यनाथ को ऑप बँक लि. बीड, महाराष्ट्र वर आर्थिक दंड ठोठावला

13 फेब्रुवारी 2023

भारतीय रिझर्व्ह बँकेने दि वैद्यनाथ को ऑप बँक लि. बीड, महाराष्ट्र वर आर्थिक दंड ठोठावला

भारतीय रिझर्व्ह बँकेने दिनांक १३ फेब्रुवारी २०२३ रोजीच्या आदेशान्वये दि वैद्यनाथ को ऑप बँक लि. बीड, महाराष्ट्र वर बँकिंग नियमन कायदा, १९४९ कलम ३६ (१) व कलम ५६ अनुसार नागरी सहकारी बँकांना दिलेल्या पर्यवेक्षणीय कृती प्रणाली (SAF) संबंधित निर्देशांचे उल्लंघन/ पालन न केल्याबद्दल १,५०,०००/- लाख (रुपये एक लाख पन्नास हजार मात्र) चा आर्थिक दंड ठोठावला आहे. उपरोक्त निर्देशांचे पालन करण्यास बँक असमर्थ राहिली ही बाब लक्षात घेता बँकिंग नियमन कायदा, १९४९ च्या कलम ४७ ए (१) (सी) आणि सह वाचलेल्या ४६ (४) (i) व कलम ५६ मध्ये अंतर्भूत असलेल्या तरतुदीनुसार भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे आपल्या अधिकाराचा वापर करीत हा दंड ठोठावण्यात आला आहे.

ही कृती नियामक अनुपालनामधील कमतरतांवर आधारित आहे आणि यामध्ये बँकेने तिच्या ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्याचा हेतू नाही.

पार्श्वभूमी

३१ मार्च २०२१ रोजीच्या आर्थिक स्थितीवर आधारित बँकेच्या जोखीम मूल्यांकन अहवालात, इतर बाबींसह असे दिसून आले की बँकेने भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे जारी कार्यपालन निर्देशांचे (Operational Instructions) उल्लंघन/ पालन न करता देणगी दिलेली आहे. याच आधारे निर्देशांचे पालन न केल्यामुळे बँकेवर दंड का लादला जाऊ नये याची कारणे दाखवा असे सूचित करणारी नोटीस बँकेला बजावण्यात आली होती.

या बाबतीत बँकेने दिलेले उत्तर, वैयक्तिक सुनावणीच्या वेळी बँकेने सादर केलेले तोंडी निवेदन विचारात घेता भारतीय रिझर्व्ह बँक या निष्कर्षावर पोहोचली की भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांचे पालन न केल्याचे सिद्ध होते आणि आर्थिक दंड लावले जाणे आवश्यक आहे.

(योगेश दयाल) 
मुख्य महाप्रबंधक

प्रेस प्रकाशनी: 2022-2023/1715

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä