Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (383.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 20/03/2023
भारतीय रिझर्व बँके ने लोकमंगल को-ऑपरेटिव बँक लि. सोलापूर (महाराष्ट्र) वर आर्थिक दंड ठोठावला

20 मार्च, 2023

भारतीय रिझर्व बँके ने लोकमंगल को-ऑपरेटिव बँक लि. सोलापूर (महाराष्ट्र) वर आर्थिक दंड ठोठावला

भारतीय रिझर्व्ह बँके ने दिनांक १४ मार्च, २०२३ रोजीच्या आदेशान्वये लोकमंगल को-ऑपरेटिव बँक लि. सोलापूर वर, भारतीय रिझर्व्ह बँके द्वारा शहरी सहकारी बँकां साठी लागू करण्यात आलेल्या प्रकटीकरण संबंधी निकषांचे आणि / अथवा शहरी सहकारी बँकांवर लादण्यात आलेल्या वैधानिक/अन्य प्रतिबंधांचे उल्लंघन केल्याबद्दल / त्यांचे पालन न केल्या बद्दल रू ३.०० लाख रुपयांचा (केवळ रुपये तीन लाख) चा आर्थिक दंड ठोठावला आहे. उपरोक्त निर्देशांचे पालन करण्यास बँक असमर्थ राहिली ही बाब लक्षात घेता बँकिंग नियमन कायदा, १९४९ च्या कलम ४७ ए(१)(सी) व ४६(४)(i) आणि कलम ५६ मधील तरतुदींनुसार भारतीय रिझर्व बँकेद्वारे आपल्या अधिकाराचा वापर करीत हा दंड ठोठावण्यात आला आहे.

ही कृती नियामक अनुपालनामधील कमतरतांवर आधारित आहे आणि यामध्ये बँकेने तिच्या ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्याचा हेतू नाही.

पार्श्वभूमी

३१ मार्च २०२० रोजीच्या आर्थिक स्थितीवर आधारित बँकेच्या जोखीम मूल्यांकन अहवालात, इतर बाबींसह असे दिसून आले की बँकेने भारतीय रिझर्व बँकेद्वारे व इतर कायद्यांद्वारे जारी केलेल्या निर्देशांचे उल्लंघन करुन आपल्या नाममात्र सदस्यांना त्यांच्या विहित मर्यादेपेक्षा अधिक कर्ज मंजूर केले. याच आधारे निर्देशांचे पालन न केल्यामुळे बँकेवर दंड का लादला जाऊ नये याची कारणे दाखवा असे सूचित करणारी नोटीस बँकेला बजावण्यात आली होती.

या बाबतीत बँकेने दिलेले उत्तर, वैयक्तिक सुनावणीच्या वेळी बँकेने सादर केलेले तोंडी निवेदन विचारात घेता भारतीय रिझर्व बँक या निष्कर्षावर पोहोचली की भारतीय रिझर्व बँकेच्या निर्देशांचे पालन न केल्याचे सिद्ध होते आणि आर्थिक दंड लावले जाणे आवश्यक आहे.

(योगेश दयाल) 
मुख्य महाप्रबंधक

प्रेस प्रकाशनी: 2022-2023/1888

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä