02 मे, 2023
भारतीय रिझर्व बँकेने धुळे आणि नंदुरबार जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी बँक लि., धुळे
(महाराष्ट्र) वर आर्थिक दंड ठोठावला
भारतीय रिझर्व बँके ने दिनांक २७ एप्रिल २०२३ रोजीच्या आदेशान्वये धुळे आणि नंदुरबार जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी बँक लि., धुळे (महाराष्ट्र) वर, भारतीय रिझर्व बँके द्वारा शहरी सहकारी बँकांसाठी लागू करण्यात आलेल्या तुमचा ग्राहक जाणून घ्या (के वाय सी) च्या संदर्भात भारतीय रिझर्व बँकेच्या निर्देशांचे उल्लंघन केल्या बद्दल/त्यांचे पालन न केल्याबद्दल ₹१.०० लाख रुपयांचा (केवळ रुपये एक लाख) दंड ठोठावला आहे. भारतीय रिझर्व्ह बँके द्वारा लादण्यात आलेल्या उपरोक्त निर्देशांचे पालन करण्यास बँक असमर्थ होती ही बाब लक्षात घेता बँकिंग नियमन कायदा १९४९ च्या कलम ४७ ए(१)(सी) व ४६ (४)(i) आणि कलम ५६ मधील तरतुदींनुसार भारतीय रिझर्व बँके द्वारे आपल्या अधिकारांचा वापर करीत हा दंड ठोठावण्यात आला आहे.
ही कृती नियामक अनुपालनामधील कमतरतांवर आधारित आहे आणि यामध्ये बँकेने तिच्या ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्याचा हेतू नाही.
पार्श्वभूमी
वरील बँकेच्या ३१ मार्च २०२१ रोजीच्या आर्थिक स्थितीवर आधारित निरीक्षण अहवालात इतर बाबींसह असे ही दिसून आले की (i) वरील बँकेने ग्राहकांच्या खात्यांची त्यांच्या जोखिमींच्या श्रेणीनुसार नियतकालिक पुनरावलोकन केले नाही, (ii) जोखिमींच्या श्रेणीनुसार आपल्या ग्राहकांच्या केवायसी चे नियतकालिक अद्यतन केले नाही आणि (iii) बँके कडे संशयास्पद व्यवहारांच्या संदर्भात जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच त्यांच्या वर नजर ठेवण्यासाठी आणि त्यांच्या बद्दल रिपोर्ट करण्यासाठी कोणती ही प्रणाली उपलब्ध नाही. त्यामुळे बँकेने भारतीय रिझर्व्ह बँके द्वारा जारी करण्यात आलेल्या निर्देशांचे उल्लंघन केले आहे / त्यांचे पालन केलेले नाही. याच आधारे निर्देशांचे पालन न केल्यामुळे बँके वर दंड का लादला जाऊ नये याची कारणे दाखवा असे सूचित करणारी नोटिस बँकेला बजावण्यात आली होती.
या बाबतीत बँकेने दिलेले उत्तर, वैयक्तिक सुनावणीच्या वेळी बँकेने सादर केलेले तोंडी निवेदन विचारात घेता भारतीय रिझर्व बँक या निष्कर्षावर पोहोचली की भारतीय रिझर्व बँकेच्या निर्देशांचे पालन न केल्याचे सिद्ध होते आणि आर्थिक दंड लावले जाणे आवश्यक आहे.
(योगेश दयाल)
मुख्य महाप्रबंधक
प्रेस प्रकाशनी: 2023-2024/164 |