Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (358.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 26/06/2023
भारतीय रिझर्व बँकेने सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँक लिमिटेड (महाराष्ट्र) वर आर्थिक दंड ठोठावला

२६ जून, २०२३

भारतीय रिझर्व बँकेने सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँक लिमिटेड (महाराष्ट्र) वर आर्थिक दंड ठोठावला

भारतीय रिझर्व बँके ने दिनांक २२ जून, २०२३ रोजीच्या आदेशान्वये सोलापूर सिध्देश्वर सहकारी बँक लिमिटेड, सोलापूर (महाराष्ट्र) वर, भारतीय रिझर्व बँके द्वारे शहरी सहकारी बँकांसाठी लागू करण्यात आलेल्या तुमचा ग्राहक जाणून घ्या (के वाय सी) च्या संदर्भात, भारतीय रिझर्व बँकेच्या निर्देशांचे उल्लंघन केल्या बद्दल / त्यांचे पालन न केल्याबद्दल १.५० लाख (केवळ रुपये एक लाख पन्नास हजार) दंड ठोठावला आहे. भारतीय रिझर्व बँकेद्वारा लादण्यात आलेल्या उपरोक्त निर्देशांचे पालन करण्यास बँक असमर्थ होती ही बाब लक्षात घेता बँकिंग नियमन कायदा १९४९ च्या कलम ४७ ए (१) (सी) सह वाचलेल्या कलम 4६ (४) (i) आणि कलम ५६ मधील तरतुदीनुसार भारतीय रिझर्व बँकेद्वारे आपल्या अधिकारांचा वापर करीत हा दंड ठोठावण्यात आला आहे.

हि कृती नियामक अनुपालनातील कमतरतांवर आधारित आहे आणि यामध्ये बँकेने तिच्या ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित कण्याचा हेतू नाही.

पार्श्वभूमी

वरील बँकेच्या ३१, मार्च २०२२ रोजीच्या आर्थिक स्थितीवर आधारित जोखीम मुल्यांकन अहवालात इतर बाबींसह असे दिसून आले की बँकेकडे ग्राहकांच्या खात्यांची जोखमीच्या श्रेणीनुसार नियतकालिक पुनरावलोकन करण्याची कोणतीही प्रणाली उपलब्ध नाही. त्यामुळे बँकेने भारतीय रिझर्व बँक द्वारे जारी करण्यात आलेल्या निर्देशांचे उल्लंघन केले आहे / त्यांचे पालन केलेले नाही. याच आधारे निर्देशांचे पालन न केल्यामुळे बँकेवर दंड का लादला जाऊ नये याची करणे दाखवा असे सूचित करणारी नोटीस बँकेला बजावण्यात आली होती.

या बाबतीत बँकेने दिलेले उत्तर, वैयक्तिक सुनावणीच्या वेळी बँकेने सादर केलेले तोंडी निवेदन विचारात घेता भारतीय रिझर्व बँक या निष्कर्षावर पोहोचली कि भारतीय रिझर्व बँकेच्या निर्देशांचे पालन न केल्याचे सिद्ध होते आणि आर्थिक दंड लावले जाणे आवश्यक आहे.

(योगेश दयाल) 
मुख्य महाप्रबंधक

प्रेस प्रकाशनी: २०२३-२०२४/४६७

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä