Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (364.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 28/12/2023
भारतीय रिझर्व बँकेने विद्यानंद को-ऑपरेटीव बँक लिमिटेड, सोलापूर (महाराष्ट्र) वर आर्थिक दंड ठोठावला

28 डिसेंबर 2023

भारतीय रिझर्व बँकेने विद्यानंद को-ऑपरेटीव बँक लिमिटेड, सोलापूर (महाराष्ट्र) वर आर्थिक दंड ठोठावला.

भारतीय रिझर्व बँकेने दिनांक 7 डिसेंबर 2023 आदेशाद्वारे विद्यानंद को-ऑपरेटीव बँक लिमिटेड, सोलापूर, महाराष्ट्र (बँक) वर नागरी सहकारी बॅंकांसाठी जारी केलेल्या प्रकटीकरण मानदंड, वैधानिक व इतर निर्बंध जे प्राथमिक (नागरी) सहकारी बँकांनी अन्य बँकेत ठेवी ठेवण्याबाबत व प्राथमिक (नागरी) सहकारी बँकांनी गुंतवणूक करणे या संदर्भात भारतीय रिझर्व बँकेने जारी केले आहेत, त्या निर्देशांचे पालन न केल्यामुळे 1 लाख (केवळ एक लाख रुपये) चा आर्थिक दंड ठोठावला आहे. बँकिंग नियमन कायदा, 1949 (BR कायदा) कलम 46(4)(i) आणि 56 सह लागू असलेल्या कलम 47A(1)(c) अन्वये भारतीय रिझर्व बँकेला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून हा दंड ठोठावण्यात आला आहे.

ही कृती नियामक अनुपालनातील कमतरतांवर आधारित आहे आणि यात बँकेने तिच्या ग्राहकांशी केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्याचा हेतू नाही.

पार्श्वभूमी

31 मार्च 2022 रोजीच्या आर्थिक स्थितीवर आधारित बँकेच्या जोखीम मूल्यांकन तपासणी अहवालात आणि त्या संबंधित सर्व पत्रव्यवहारावरून असे निदर्शनास आले की बँकेने, भारतीय रिझर्व बँकेद्वारे जारी उपरोक्त निर्देशांचे उल्लंघन करुन/पालन न करता धोरणात्मक अंतर बँक ठेवीवर घालण्यात आलेल्या एकंदर मर्यादेचे उल्लंघन केलेले आहे. परिणामी, बँकेला कारण दाखवा नोटीस बजावण्यात आली होती, ज्यामध्ये म्हटल्याप्रमाणे, वरील निर्देशांचे पालन करण्यात अयशस्वी झाल्याबद्दल बँकेला दंड का आकारला जाऊ नये याची कारणे दाखवा अशी विचारणा करण्यात आली होती.

नोटिसला बँकेने दिलेले उत्तर व वैयक्तिक सुनावणीच्या वेळी बँकेने सादर केलेले तोंडी निवेदन विचारात घेता भारतीय रिझर्व बँक या निष्कर्षावर पोहोचली कि भारतीय रिजर्व बँकेच्या निर्देशांचे पालन न केल्याचे सिद्ध होते आणि आर्थिक दंड लावला जाणे आवश्यक आहे.

(योगेश दयाल) 
मुख्य महाप्रबंधक

प्रेस प्रकाशनी: 2023-2024/1559

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä