Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (274.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 29/01/2024
भारतीय रिझर्व बँकेने डॉ पंजाबराव देशमुख अर्बन कोऑपरेटीव बँक लिमिटेड, अमरावती, महाराष्ट्र वर आर्थिक दंड ठोठावला

29 जानेवारी 2024

भारतीय रिझर्व बँकेने डॉ पंजाबराव देशमुख अर्बन कोऑपरेटीव बँक लिमिटेड, अमरावती,
महाराष्ट्र वर आर्थिक दंड ठोठावला

भारतीय रिझर्व बँकेने दिनांक 8 जानेवारी 2024 रोजीच्या डॉ पंजाबराव देशमुख अर्बन कोऑपरेटीव बँक लिमिटेड, अमरावती, महाराष्ट्रा (बँक) वर, पर्यवेक्षी कृती तत्वांतर्गत, रिझर्व बँकेने जारी केलेल्या विशेष निर्देशांचे उल्लंघन केल्याबद्दल आणि नागरी सहकारी बॅंकांसाठी कर्जाचे व्यवस्थापन, तसेच ‘आपला ग्राहक ओळखा (KYC) बद्दल 2016’ च्या निर्देशांचे पालन न केल्याबद्दल 5.00 लाख (केवळ पाच लाख रुपये) चा आर्थिक दंड ठोठावला आहे. बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या कलम 46 (4)(i) आणि 56 सह लागू असलेल्या कलम 47A(1)(c) अन्वये भारतीय रिझर्व बँकेला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून हा दंड ठोठावण्यात आला आहे.

हि कृती नियामक अनुपालनातील कमतरतांवर आधारित आहे आणि यामध्ये बँकेने तिच्या ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहारांच्या किवा करारांच्या वैध्यतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्याचा हेतू नाही.

पार्श्वभूमी

31 मार्च 2022 रोजीच्या आर्थिक स्थितीवर आधारित बँकेच्या जोखीम मुल्यांकन तपासणी अहवालात आणि या संबंधित सर्व पत्रव्यवहारावरून असे निदर्शनास आले कि बँकेने, i) पर्यवेक्षी कृती तत्वांतर्गत जारी केलेल्या विशेष निर्देशांचे पालन न करता जोखीम मूल्याच्या 100% पेक्षा जास्त नवीन कर्ज व अग्रिम मंजूर केले आहे, ii) बुलेट परतफेड योजनेंतर्गत नियामक मर्यादेपलीकडे सोन्याच्या दागिन्यावर कर्ज मंजूर केले गेले, iii) ग्राहकांचे जोखीम वर्गीकरण केवायसी नुसार नियमितपणे अध्यतन केले नाही, iv) खात्यांचे जोखीम आधारित नियतकालिक पुनरावलोकन केले नाही आणि v) प्रभावी ओळख व संशयास्पद व्यवहारांची सूचना देणारी सुदृढ साफ्टवेयरची व्यवस्था बैंके कडे नाही. परिणामतः बँकेला कारण दाखवा नोटीस बजावण्यात आली होती, जामध्ये म्हटल्याप्रमाणे, वरील निर्देशांचे पालन करण्यास अयशस्वी झाल्याबद्दल बँकेला दंड का आकारला जाऊ नये याची कारणे दाखवा अशी विचारणा करण्यात आली होती.

नोटीसला बँकेने दिलेले उत्तर व वैयक्तीक सुनावणीच्या वेळी बँकेने सादर केलेले तोंडी निवेदन व त्यानंतर केलेले अतिरिक्त निवेदन विचारात घेता भारतीय रिझर्व बँक या निष्कर्षावर पोहोचली कि भारतीय रिझर्व बँकेच्या निर्देशांचे पालन न केल्याचे सिद्ध होते आणि आर्थिक दंड लावले जाणे आवश्यक आहे.

(योगेश दयाल) 
मुख्य महाप्रबंधक

प्रेस प्रकाशनी: 2023–2024/1760

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä