1 फेब्रुवारी 2024
भारतीय रिझर्व बँकेने द शिरपूर पीपल्स को ऑपरेटिव बॅंक लिमिटेड, धुळे (महाराष्ट्र), वर
आर्थिक दंड ठोठावला
भारतीय रिझर्व बँकेने दिनांक 18 जानेवारी 2024, रोजीच्या आदेशाद्वारे द शिरपूर पीपल्स कोऑपरेटिव बँक लिमिटेड, धुळे, महाराष्ट्र (बँक) वर, भारतीय रिझर्व बँकेने प्रकटीकरण मानदंड, वैधानिक व इतर निर्बंध आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर्स वर लावलेल्या निर्देशांचे पालन न केल्याबद्दल ₹2,00,000/- (केवळ दोन लाख रुपये) चा आर्थिक दंड ठोठावला आहे. बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या कलम 46(4)(i) आणि कलम 56 सह लागू असलेल्या कलम 47A(1)(c) अन्वये भारतीय रिझर्व बँकेला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून हा दंड ठोठावण्यात आला आहे.
ही कृती नियामक अनुपालनातील कमतरतांवर आधारित आहे आणि यात बँकेने तिच्या ग्राहकांशी केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किवा कराराच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा हेतू नाही.
पार्श्वभूमी
31 मार्च 2022 रोजीच्या आर्थिक स्थितीवर आधारित बँकेच्या जोखीम मूल्यांकन तपासणी अहवालात, आणि या संबंधित सर्व पत्रव्यवहारावरून असे निदर्शनास आले कि बँकेने ज्या फर्ममध्ये संचालकांचे नातेवाईक संबंधित होते त्यांना कर्ज मंजूर केले होते. परिणामी, बँकेला कारण दाखवा नोटीस बजावण्यात आली होती, ज्यात म्हटल्याप्रमाणे वरील निर्देशांचे पालन करण्यात अयशस्वी झाल्याबद्दल बँकेला दंड का आकारला जाऊ नये याची कारणे दाखवा अशी विचारणा करण्यात आली होती.
नोटीसला बँकेने दिलेले उत्तर व वैयक्तिक सुनावणीच्या वेळी बँकेने सादर केलेले तोंडी निवेदन विचारात घेता भारतीय रिझर्व बँक या निष्कर्षावर पोहोचली कि वर उल्लेखित, भारतीय रिझर्व बँकेच्या निर्देशांचे पालन न केल्याचे सिद्ध होते आणि आर्थिक दंड लावले जाणे आवश्यक आहे.
(योगेश दयाल)
मुख्य महा प्रबंधक
प्रेस प्रकाशनी: 2023–2024/1783 |