Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (285.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 01/08/2024
भारतीय रिजर्व बँकेने अलिबाग को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक लिमिटेड, अलिबाग, महाराष्ट्र वर आर्थिक दंड ठोठावला

01 ऑगस्ट 2024

भारतीय रिजर्व बँकेने अलिबाग को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक लिमिटेड, अलिबाग, महाराष्ट्र वर आर्थिक दंड
ठोठावला

भारतीय रिजर्व बँकेने 24 जुलै 2024 रोजीच्या आदेशाद्वारे अलिबाग को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक लिमिटेड, अलिबाग, महाराष्ट्र (बँक) वर भारतीय रिजर्व बँकेने ‘अग्रिम व्यवस्थापन - UCBs’ वर जारी केलेल्या निर्देशांचे पालन न केल्याबद्दल 2.00 लाख (केवळ दोन लाख रुपये) चा आर्थिक दंड ठोठावला आहे. बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या कलम 46(4)(i) आणि कलम 56 सह लागू असलेल्या कलम 47A(1)(c) अंतर्गत प्रदान केलेल्या भारतीय रिजर्व बँकेमध्ये निहित अधिकारांचा वापर करून हा दंड ठोठावण्यात आला आहे.

आरबीआयद्वारे बँकेची 31 मार्च 2023 रोजीच्या आर्थिक स्थितीच्या संदर्भात वैधानिक तपासणी करण्यात आली होती. आरबीआय निर्देशांचे पालन न केल्याचे पर्यवेक्षी निष्कर्ष आणि त्या संदर्भात संबंधित पत्रव्यवहार यांवर आधारित, बँकेला नोटीस बजावण्यात आली होती, ज्यामध्ये म्हटल्याप्रमाणे, वरील निर्देशांचे पालन करण्यात अयशस्वी झाल्याबद्दल बँकेला दंड का लावला जाऊ नये याची कारणे दाखवा अशी विचारणा करण्यात आली होती. नोटिशीला बँकेचे उत्तर, वैयक्तिक सुनावणी दरम्यान केलेले तोंडी सादरीकरण यांचा विचार केल्यानंतर, भारतीय रिजर्व बँकेला, आढळले की, बँकेवर बुलेट परतफेड योजनेंतर्गत विहित नियामक मर्यादेच्या पलीकडे सुवर्ण कर्ज मंजूर करण्याचा आरोप कायम आहे, ज्यामुळे बँकेवर आर्थिक दंड आकारला जाणे आवश्यक आहे.

ही कृती नियामक अनुपालनातील कमतरतेवर आधारित आहे आणि यामधे बँकेने तिच्या ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्याचा हेतू नाही. याशिवाय, हा आर्थिक दंड लादणे हे बँकेच्या विरोधात आरबीआयने सुरू केलेल्या इतर कोणत्याही कारवाईचा पूर्वग्रह न ठेवता आहे.

(पुनीत पांचोली) 
मुख्य महाप्रबंधक

प्रेस प्रकाशनी: 2024-2025/819

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä