Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (433.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 14/10/2024
भारतीय रिझर्व बँकेने दि अर्बन को-ऑपरेटीव बँक लिमिटेड धरणगाव, (महाराष्ट्र) ला आर्थिक दंड ठोठावला

14 ऑक्टोबर, 2024

भारतीय रिझर्व बँकेने दि अर्बन को-ऑपरेटीव बँक लिमिटेड धरणगाव, (महाराष्ट्र) ला आर्थिक दंड ठोठावला

भारतीय रिझर्व बँकेने दिनांक 07 ऑक्टोबर 2024, रोजीच्या आदेशाद्वारे द अर्बन को-ऑपरेटीव बँक लिमिटेड, धरणगाव, महाराष्ट्र (बँक) ला, भारतीय रिझर्व बँकेद्वारे पर्यवेक्षी कृती फ्रेमवर्क (SAF) अंतर्गत जारी केलेल्या विशिष्ट निर्देशांचे पालन न केल्याबद्दल 50,000.00 (केवळ पन्नास हजार रुपये) चा आर्थिक दंड ठोठावला आहे. बँकिंग नियमन कायदा, 1949 (BR कायदा) च्या कलम 46(4)(i) आणि कलम 56 सह लागू असलेल्या कलम 47A(1)(c) अन्वये भारतीय रिझर्व बँकेला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून हा दंड ठोठावण्यात आला आहे.

दिनांक 31 मार्च 2023 रोजीच्या आर्थिक स्थितीवर आधारित बँकेची वैधानिक तपासणी भारतीय रिझर्व बँकेद्वारे केली गेली होती. या तपासणी अहवालातील पर्यवेक्षी निष्कर्षांचे, भारतीय रिझर्व बँकेद्वारे पर्यवेक्षी कृती फ्रेमवर्क (SAF) अंतर्गत जारी केलेल्या निर्देशांसोबत पालन न केल्याने आणि यासंबंधी केलेल्या पत्रव्यवहाराच्या आधारे बँकेला नोटीस बजावण्यात आली होती, त्यात म्हटल्याप्रमाणे, वरील निर्देशांचे पालन करण्यात अयशस्वी झाल्याबद्दल बँकेला दंड कां आकारला जाऊ नये, याची कारणे दाखवा अशी विचारणा करण्यात आली होती.

नोटीसला बँकेने दिलेले उत्तर व वैयक्तिक सुनावणीच्या वेळी बँकेने सादर केलेले तोंडी निवेदन विचारात घेता, अन्य बाबींसह, भारतीय रिझर्व बँकेला असे आढळून आले की बँकेविरुद्धचा खालील आरोप सिद्ध होत आहे आणि आर्थिक दंड लावला जाणे आवश्यक आहे.

बँकेने, भारतीय रिझर्व बँकेच्या पूर्वपरवानगीशिवाय भांडवली खर्च केला होता आणि पर्यवेक्षी कृती फ्रेमवर्क (SAF) अंतर्गत जारी केलेल्या निर्देशांचे उल्लंघन केले होते.

ही कृती नियामक अनुपालनातील कमतरतांवर आधारित आहे आणि यात बँकेने तिच्या ग्राहकांशी केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किवा कराराच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा हेतू नाही. तसेच, बँकेविरुद्ध भारतीय रिझर्व बँकेने सुरू केलेल्या इतर कोणत्याही कारवाईबद्दल पूर्वग्रह न ठेवता हा आर्थिक दंड लावला आहे.

(पुनीत पंचोली) 
मुख्य महाप्रबंधक

प्रेस प्रकाशनी: 2024–2025/1287

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä