Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (294.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 21/10/2024
भारतीय रिझर्व्ह बँकेने फॅमिली होम फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई, महाराष्ट्र वर आर्थिक दंड ठोठावला

21 ऑक्टोबर 2024

भारतीय रिझर्व्ह बँकेने फॅमिली होम फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई, महाराष्ट्र वर आर्थिक दंड ठोठावला

भारतीय रिझर्व्ह बँकेने 17 ऑक्टोबर 2024 रोजीच्या आदेशाद्वारे फॅमिली होम फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई, महाराष्ट्र (कंपनी) वर भारतीय रिझर्व्ह बँकेने ‘तुमच्या ग्राहकाला जाणून घ्या (KYC)’ वर जारी केलेल्या काही निर्देशांचे पालन न केल्याबद्दल 50,000/- (केवळ पन्नास हजार रुपये) चा आर्थिक दंड ठोठावला आहे. नॅशनल हाऊसिंग बँक ॲक्ट, 1987 च्या कलम 52A अंतर्गत प्रदान केलेल्या भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये निहित अधिकारांचा वापर करून हा दंड ठोठावण्यात आला आहे.

नॅशनल हाऊसिंग बँकद्वारे कंपनीची 31 मार्च 2022 आणि 31 मार्च 2023 रोजीच्या आर्थिक स्थितीच्या संदर्भात वैधानिक तपासणी करण्यात आली होती. आरबीआय निर्देशांचे पालन न केल्याचे पर्यवेक्षी निष्कर्ष आणि त्या संदर्भात संबंधित पत्रव्यवहार यांवर आधारित, कंपनीला नोटीस बजावण्यात आली होती, ज्यामध्ये म्हटल्याप्रमाणे, वरील निर्देशांचे पालन करण्यात अयशस्वी झाल्याबद्दल कंपनीला दंड का लावला जाऊ नये याची कारणे दाखवा अशी विचारणा करण्यात आली होती.

नोटिशीला कंपनीचे उत्तर, वैयक्तिक सुनावणी दरम्यान केलेले तोंडी सादरीकरण आणि कंपनीद्वारे केलेल्या अतिरिक्त सबमिशनची तपासणी, यांचा विचार केल्यानंतर, भारतीय रिझर्व्ह बँकेला, आढळले की, कंपनीविरुद्ध खालील आरोप कायम आहेत, ज्यामुळे कंपनीवर आर्थिक दंड आकारला जाणे आवश्यक आहे.

कंपनीने

  1. आपल्या ग्राहकांचे जोखीम वर्गीकरण केले नाही;

  2. आपल्या ग्राहकांच्या जोखमीच्या वर्गीकरणाचा आढावा घेतला नाही; आणि

  3. आपल्या ग्राहकांचे केवायसी नियमितपणे अपडेट केले नाही.

ही कृती नियामक अनुपालनातील कमतरतांवर आधारित आहे आणि यामधे कंपनीने तिच्या ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्याचा हेतू नाही. याशिवाय, हा आर्थिक दंड लादणे हे कंपनीच्या विरोधात आरबीआयने सुरू केलेल्या इतर कोणत्याही कारवाईचा पूर्वग्रह न ठेवता आहे.

(पुनीत पंचोली) 
मुख्य महाप्रबंधक

प्रेस प्रकाशनी: 2024-2025/1348

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä