Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (229.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 26/05/2014
आरबीआयचा तिच्या खोट्या वेबसाईटबाबत सावधानतेचा इशारा

मे 26, 2014

आरबीआयचा तिच्या खोट्या वेबसाईटबाबत सावधानतेचा इशारा

आज रिझर्व बँकेच्या नजरेस आले आहे की, काही अज्ञात व्यक्तींद्वारे, निरनिराळ्या बँकिंग सेवा देऊ करणारी व “आरबीआय बचत खाते” उघडण्यास ऑनलाईन अर्ज करण्यास जनतेला सांगणारी एक खोटी वेबसाईट http://www.rbi-inonline.org/savings.html येथे निर्माण करण्यात आली आहे.

रिझर्व बँक येथे स्पष्ट करत आहे की, भारताची एक केंद्रीय बँक म्हणून, भारतीय रिझर्व बँक, बचत बँक खाते, चालु खाते किंवा क्रेडिट कार्ड्स ह्यासारख्या, वाणिज्य बँका देऊ करत असलेल्या सेवा देऊ करत नाही. त्यामुळे, ह्या खोट्या वेबसाईटवर निर्देशित केलेल्या ऑन लाईन सेवा, रिझर्व बँकेद्वारे दिल्या जाण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. रिझर्व बँकेने जनतेला सावधानतेचा इशारा दिला आहे की, जनतेने, ह्या खोट्या वेबसाईट देऊ केलेल्या खोट्या ऑफर्सना बळी पडू नये. ह्याशिवाय रिझर्व बँकेने जनतेला सावधानतेचा इशारा दिला आहे की, त्या वेबसाईटवर ऑन लाईन अर्ज केल्यामुळे, स्वतःची वैय्यक्तिक महत्वाची माहिती दिली जाऊन त्याचा गैरवापर केला जाऊन, जनतेचे आर्थिक व इतर प्रकारचे नुकसानच होऊ शकते.

जनतेने रिझर्व बँकेच्या अधिकृत वेबसाईटला rbi.org.in भेट द्यावी, आणि रिझर्व बँकेच्या किंवा तिच्या गव्हर्नरांच्या आणि वरिष्ठ अधिका-यांच्या नावे पाठविलेल्या प्रचंड पैशाच्या निरनिराळ्या खोट्या ऑफर्स बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी व अशा बाबतीत काय करावे ह्यासाठी, आधी दिलेली वृत्तपत्र निवेदने पहावीत व ती मिळविण्या/पाहण्यासाठी, हेडलाईन्स स्क्रोल कराव्यात.

अल्पना किल्लावाला
प्रधान मुख्य महाव्यवस्थापक

वृत्तपत्रांसाठी निवेदन : 2014-2015/2290

संबंधित वृत्तपत्र निवेदने व अधिसूचना
ऑक्टोबर 15, 2012 आरबीआय, तिच्या नावे पाठविलेल्या फिशिंग मेलला प्रतिसाद न देण्याबाबत, आरबीआयचा जनतेला सावधानतेचा इशारा
सप्टेंबर 14 2012 तुमच्या इंटरनेट बँकिंग खात्याचा तपशील मागणा-या मेल्सना प्रतिसाद देऊ नका. आरबीआयचा जनतेला सावधानतेचा इशारा
मे 21, 2012 फिशिंग मेलबाबत आरबीआयचा सावधानतेचा इशारा
फेब्रुवारी 06, 2012 खोट्या ऑफर्सबाबत आरबीआयचा जनतेला पुनश्च सावधानतेचा इशारा
एप्रिल 05, 2011 तुमच्या बँक खात्याचा तपशील आरबीआय कधीही मागत नाही
फेब्रुवारी 15, 2011 विदेशातून खूप मोठा पैसा मिळविण्यासाठी पैसे देऊ नका - आरबीआयचा इशारा.
मे 28, 2010 निधी हस्तांतरणाच्या खोट्या ऑफर्सना बळी पडू नका - आरबीआयचा इशारा
मे 26, 2010 लॉटरी, पैसा फिरविण्याच्या योजना, इतर स्वस्त निधींच्या खोट्या योजना इत्यादींसाठी निधी प्रेषण.
जुलै 30, 2009 खोट्या ऑफर्स/लॉटरीची बक्षिसे/स्वस्त निधीच्या योजनांच्या ऑफर्स ह्यापासून सावध रहा - आरबीआय
डिसेंबर 07, 2007 विदेशातून स्वस्त निधीचे प्रेषण करण्याच्या खोट्या ऑफर्सबाबत आरबीआयचा जनतेला सावधानतेचा इशारा
 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä