प्रधानमंत्री गरीब कल्याण ठेव योजना (पीएमजीकेडीएस), 2016 |
डिसेंबर 16, 2016
प्रधानमंत्री गरीब कल्याण ठेव योजना (पीएमजीकेडीएस), 2016
भारत सरकारने, भारतीय रिझर्व बँकेशी सल्लामसलत करुन, प्रधानमंत्री गरीब कल्याण ठेव योजना, 2016 अधिसूचित केली आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना 2016 खाली, आपले लपविलेले/अप्रकट उत्पन्न घोषित न केलेल्या व्यक्तीकडून ह्या योजनेखाली ते जमा करता येऊ शकते. घोषित केलेल्या अप्रकट उत्पन्नाच्या पंचवीस टक्क्यांपेक्षा कमी नसलेली जमा-रक्कम, डिसेंबर 17, 2016 (शनिवार) ते मार्च 31, 2017 (शुक्रवार) पर्यंत, प्राधिकृत बँकांमध्ये (भारत सरकारने अधिसूचित केलेल्या) जमा केली जाऊ शकते. ह्या ठेवी/जमा रकमा, भारतीय रिझर्व बँकेमधील बाँड्स लेजर खात्यात (बीएलए) घोषणाकाराच्या क्रेडिटमध्ये ठेवल्या जातील आणि चार वर्षे पूर्ण झाल्यानंतर परत केल्या जातील. ह्या योजनेची सविस्तर माहिती https://rbi.org.in येथे मिळविता येईल
अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1555 |
|