(नोव्हेंबर 23, 2017 रोजी अद्यावत केलेले)
सरकारी सिक्युरिटीजच्या प्रायमरी मार्केटमध्ये फुटकळ सहभाग ठेवण्यास प्रोत्साहन देण्यासाठी, दिनांकित सरकारी सिक्युरिटीज व ट्रेझरी बिलांच्या बाबतीत अस्पर्धात्मक बिडींगची सुविधा लिलावांमध्ये सुरु करण्यात आली आहे. ह्यामुळे, गुंतवणुकदाराला, स्वीकृत स्पर्धात्मक बोलींच्या भारित सरासरी दराने विशिष्ट संख्येच्या सिक्युरिटीज खरेदी करण्यास मदत होईल.
(1) ह्या योजनेत कोण भाग घेऊ शकतो ?
अस्पर्धात्मक बिडींग योजनेत फुटकळ निवेशक मुक्तपणे भाग घेऊ शकतात. फुटकळ निवेशक म्हणजे, व्यक्ती, कंपन्या, संस्था, कॉर्पोरेट संस्था, संस्था, प्रॉविडंट फंड, ट्रस्ट आणि आरबीआयने विहित केलेली कोणतीही संस्था.
(2) सर्वच लिलावांमध्ये अस्पर्धात्मक बिडींग करण्यास परवानगी आहे काय ?
एखाद्या लिलावात अस्पर्धात्मक बोलीच्या सुविधेची घोषणा संबंधित वृत्तपत्र-निवेदनाबरोबर घोषित केली जाईल आणि ती माहिती आरबीआयच्या वेबसाईटवरही उपलब्ध केली जाईल.
(3) अस्पर्धात्मक बोलीसाठी देऊ करण्यात येणारी रक्कम किती असेल ?
भारत सरकारच्या दिनांकित सिक्युरिटीज व टी बिलांच्या विहित केलेल्या लिलावांमध्ये, त्या अधिसूचित रकमांच्या 5 टक्के पर्यंत विहित रकमेच्या अस्पर्धात्मक बोली करण्यास परवानगी आहे - म्हणजेच, विहित केलेली रक्कम रु.1000 कोटी असेल तर, रु.50 कोटी एवढी रक्कम, अस्पर्धात्मक बोलींसाठी राखून ठेवण्यात येईल व उरलेली रु.950, स्पर्धात्मक बोलींसाठी ठेवले जातील.
(4) पात्र असलेले निवेशक ह्या लिलावात कशा प्रकारे भाग घेऊ शकतात ?
पात्र असलेले निवेशक थेटपणे भाग घेऊ शकत नाहीत. त्यांना एखाद्या अॅग्रिगेटर किंवा फॅसिलिटेटर मार्फतच येणे आवश्यक आहे.
(5) अॅग्रिगेटर किंवा फॅसिलिटेटर म्हणजे कोण ?
अॅग्रिगेटर किंवा फॅसिलिटेटर म्हणजे, निवेशकाकडून मिळालेल्या बोली एकत्रित करुन, प्राथमिक लिलावाच्या अस्पर्धात्मक विभागात/क्षेत्रात केवळ एकच बोली सादर करण्याची परवानगी असलेली एखादी अनुसूचित बँक किंवा प्राथमिक डीलर किंवा विहित केलेला स्टॉक एक्सचेंज
(6) कमाल/किमान बोलीची रक्कम कोणती ?
बोलीसाठीची किमान रक्कम रु.10,000 (दर्शनी मूल्य) व रु.10,000 च्या पटीत असेल. जीओआयच्या डेटेड सिक्युरिटीजच्या लिलावासाठी, केवळ एकाच अस्पर्धात्मक बोलीची रक्कम प्रति सिक्युरिटी, प्रति लिलाव रु.2,00,00,000 (दर्शनी मूल्य) पेक्षा अधिक असू नये.
(7) ह्या योजनेखाली निवेशक किती बोली/बोल्या लावू शकतो ?
विहित केलेल्या प्रत्येक लिलावामध्ये, निवेशक, त्याच्या अॅग्रिगेटरच्या मार्फत केवळ एकच बोली लावू शकतो. जिच्या मार्फत निवेशक बोली लावतो ती अॅग्रिगेटर किंवा फॅसिलिटेटर संस्था, निवेशक अन्य कोणत्याही अॅग्रिगेटर किंवा फॅसिलिटेटर मार्फत बोली लावत नाही असे शपथपत्र निवेशकाकडून घेऊन ते रेकॉर्डमध्ये ठेवील.
(8) ह्यासाठी अर्जाचा फॉर्म असतो काय ?
होय. तो आरबीआयच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. जिच्या मार्फत अर्ज करावयाचा आहे ती अॅग्रिगेटर किंवा फॅसिलिटेटर संस्था, तो फॉर्म मिळविण्यास निवेशकाला मदत करील.
(9) सिक्युरिटीसाठीचे प्रदान निवेशकाने कसे करावे ?
जिच्या मार्फत बोली लावली आहे त्या अॅग्रिगेटर किंवा फॅसिलिटेटर संस्थेला अस्पर्धात्मक बिड प्रदान करील व त्यांच्याकडून तो सिक्युरिटीज मिळवील.
(10) अॅग्रिगेटर किंवा फॅसिलिटेटर संस्थांसाठी काही आकार लावतील काय ?
ग्राहकांना ही सेवा देण्यासाठी, अॅग्रिगेटर किंवा फॅसिलिटेटर, प्रति रु.100 साठी 6 पैसे कमिशन मिळवू शकतात. हा खर्च ते विक्रीच्या किंमतीत समाविष्ट करु शकतात किंवा ग्राहकांकडून वेगळ्याने घेऊ शकतात. ह्या किंमतीमध्ये, फंडिंग कॉस्ट ह्यासारखा इतर कोणताही खर्च समाविष्ट करण्यास अॅग्रिगेटर किंवा फॅसिलिटेटरला परवानगी नाही.
(11) अस्पर्धात्मक बिडाला प्रदानांचे प्रकार/रीती कशा कळतील ?
सिक्युरिटीजची किंमत, जमा झालेले व्याज (लागु असेल तेथे), आणि कमिशन ह्याबाबतचे प्रदान ग्राहकांकडून मिळविण्यासाठीच्या रीती, अॅग्रिगेटर किंवा फॅसिलिटेटरनेच ठरवावयाच्या आहेत आणि त्या, हप्त्यासाठी ग्राहकाबरोबर केलेल्या करारात ते स्पष्टपणे निर्देशित केले जावे.
(12) अस्पर्धात्मक बिडर्सना वाटप कोणत्या दराने केले जाईल ?
अस्पर्धात्मक क्षेत्रासाठी असलेले वाटप स्पर्धात्मक बिडर्सच्या केलेल्य सर्व वाटपांच्या भारित सरासरी मूल्याएवढे असेल. उत्पन्न-आधारित लिलावाच्या बाबतीत, अस्पर्धात्मक बोलींसाठीचे वाटप-मूल्य काढण्यासाठी, त्या लिलावातील भारित सरासरी मूल्याचा वापर केला जाईल.
(13) अस्पर्धात्मक बिडर्सना करावयाचे बोलींचे वाटप आरबीआय कसे करेल ?
अस्पर्धात्मक क्षेत्राखाली, आरबीआय, अॅग्रिगेटर किंवा फॅसिलिटेटर्सना बिड्सचे वाटप करील व ते त्यांच्या बिडर्सना वाटून देतील.
(14) सिक्युरिटीज कशा प्रकारे दिल्या जातील ?
ह्या सिक्युरिटीज, आरबीआय, केवळ एसजीएल स्वरुपातच देईल. त्या सिक्युरिटीज, अॅग्रिगेटर किंवा फॅसिलिटेटरच्या सीएसजीएल खात्यातच जमा केल्या जातील व त्यानंतर, त्या सिक्युरिटीज, निवेशकाच्या गिल्ट खात्यात किंवा डिमॅट खात्यात जमा केल्या जातील.
(15) अस्पर्धात्मक बोलीची रक्कम राखीव रकमेपेक्षा अधिक असल्यास, आरबीआय, अस्पर्धात्मक बोलींचे वाटप कसे करील ?
अस्पर्धात्मक बिडिंगमध्ये, बिडची एकूण रक्कम, राखीव रकमेपेक्षा अधिक असल्यास, त्याबाबतचे वाटप प्रो-रेटा धर्तीवर केले जाईल.
उदाहरण
समजा, अस्पर्धात्मक धर्तीमध्ये वाटप करण्यासाठी राखून ठेवलेली रक्कम रु.10 कोटी आहे. अस्पर्धात्मक क्षेत्रासाठी असलेल्या बिड्सची रक्कम रु.12 कोटी आहे. अंशात्मक वाटप टक्केवारी = 10/12 = 83.33% म्हणजेच, पात्र असलेल्या निवेशकांकडून मिळालेल्या बोली सादर करणा-या प्रत्येक बँकेला किंवा पीडीला किंवा विहित स्टॉक एक्सचेंजला, त्याने सादर केलेल्या एकूण रकमेच्या 83.33% मिळतील. येथे नोंद घेण्यात यावी की, वाटप केलेल्या रकमा 10,000/- च्या पटीत असल्याची खात्री करण्यासाठी, राऊंडिंग ऑफ केले गेल्याने, कधी कधी प्रत्यक्ष वाटपाची रक्कम अंशात्मक वाटप गुणोत्तरापेक्षा थोडी वेगळी असेल.
(16) अस्पर्धात्मक बिडिंगमध्ये बोलीची रक्कम राखीव रकमेपेक्षा कमी असल्यास काय ?
एकूण बोलीची एकूण रक्कम, राखीव रकमेपेक्षा कमी असल्यास, सर्व अर्जदारांना संपूर्ण वाटप केले जाईल आणि कमी पडणारी रक्कम, स्पर्धात्मक लिलावासाठी मिळविली/जोडली जाईल.
(17) अॅग्रिगेटर किंवा फॅसिलिटेटर अंशात्मक वाटप कसे करतील ?
बिड्सचे वाटप करतेवेळी (संपूर्ण किंवा अंशतः) ठरविलेल्या रितीनेच त्यांच्या ग्राहकांना सिक्युरिटीजचे वाटप करण्याची जबाबदारी अॅग्रिगेटर किंवा फॅसिलिटेटरचीच असेल.
(18) सिक्युरिटीजसाठीचे प्रदान अॅग्रिगेटर किंवा फॅसिलिटेटरला, ही सिक्युरिटी देण्याच्या तारखेनंतर केले गेल्यास काय ?
अॅग्रिगेटर किंवा फॅसिलिटेटरने सिक्युरिटी देण्याच्या तारखेसच प्रदान करणे आवश्यक असल्याने, ग्राहकाने देण्याच्या तारखेनंतर प्रदान केल्यास, ग्राहकाने, अॅग्रिगेटर किंवा फॅसिलिटेटरला देय असलेल्या रकमेत उपवर्जित व्याजही समाविष्ट असेल.
(19) निवेशकाला किती दिवसांनी सिक्युरिटी मिळेल ?
सिक्युरिटीजचे ग्राहकांना करावयाचे हस्तांतरण, लिलावाच्या तारखेपासून पाच कामकाजाच्या दिवसात पूर्ण करणे आवश्यक आहे. ही जबाबदारी, अॅग्रिगेटर किंवा फॅसिलिटेटरचीच असेल. |