(ऑक्टोबर 26, 2020 नुसार अद्यावत केल्याप्रमाणे)
प्रश्न 1 : एचटीएम पुस्तकांमधील टीएलटीआरओमध्ये मिळालेल्या रकमेसाठी बँकांनी नेहमीच विहित/विशिष्ट सिक्युरिटीज ठेवणे आवश्यक आहे काय ?
उत्तर : होय. टीएलटीआरओ परिपक्व होईपर्यंत एचटीएम पुस्तकांमधील टीएलटीआरओमध्ये मिळालेल्या रकमेसाठी बँकांनी नेहमीच विहित/विशिष्ट सिक्युरिटीज ठेवणे आवश्यक आहे.
प्रश्न 2 : टीएलटीआरओच्या कर्ज मुदतीसाठी बँकेने मार्च 26, 2020 रोजी तिच्या एचएफटी/एएफएस पोर्टफोलियोमध्ये धारण केले असल्याच्या सममूल्य रक्कम धारण करणे सुरुच ठेवणे बँकेसाठी आवश्यक आहे काय ?
उत्तर : टीएलटीआरओ योजनेखाली टीएलटीआरओ खाली कर्जाऊ घेतलेली रक्कम, बँकांनी प्राथमिक/दुय्यम मार्केटमधील नवीन सिक्युरिटीज मिळविण्यासाठी (मार्च 26, 2020 रोजी त्या बँकेने धारण केलेल्या विहित सिक्युरिटीजमधील आऊटस्टँडिंग स्टेटमेंटच्याही व्यतिरिक्त) गुंतवणुक करणे आवश्यक आहे. तथापि, टीएलटीआरओ योजनेत घेतलेल्या सहभागाचा परिणाम/आघात बँकेच्या विद्यमान गुंतवणुकीवर होणार नाही आणि विद्यमान विनियामक/अंतर्गत मार्गदर्शक तत्वांनुसार बँका त्यांचे एएफएस/एचएफटी पोर्टफोलियोजच्या कार्यकृती करणे सुरु ठेवू शकतात.
प्रश्न 3 : टीएलटीआरओ योजनेखाली मिळविण्याच्या सिक्युरिटीजवर काही परिपक्वता - निर्बंध आहेत काय ?
उत्तर : टीएलटीआरओ योजनेखाली मिळविण्याच्या विहित सिक्युरिटीजवर कोणतेही परिपक्वता निर्बंध नाहीत. तथापि, बँकेच्या एचटीएम पोर्टफोलियोमधील विहित सिक्युरिटीजची आऊटस्टँडिंग रक्कम, टीएलटीआरओ योजनेखाली मिळविलेल्या रकमेच्या स्तरापेक्षा खाली जाऊ नये.
प्रश्न 4 : दीर्घ मुदतीच्या विहित सिक्युरिटीमधील गुंतवणुक, टीएलटीआरओच्या परिपक्वतेनंतरही एचटीएम म्हणून वर्गीकृत केली जाणे सुरुच राहील काय ?
उत्तर : टीएलटीआरओ योजनेखाली मिळविलेल्या विहित सिक्युरिटींना, त्या परिपक्व होईपर्यंत, एचटीएम पोर्टफोलियोमध्ये राहण्याची परवानगी असेल.
प्रश्न 5 : टीएलटीआरओ योजनेखाली मिळविलेल्या विहित सिक्युरिटीजचे वर्गीकरण बँका एएफएस किंवा एचएफटी म्हणून करु शकतात काय ?
उत्तर : टीएलटीआरओ योजनेखाली मिळविलेल्या विहित सिक्युरिटीज, एचटीएम वर्गात वर्गीकृत केल्या जातील. तथापि, त्या मिळविण्याच्या वेळी, अशा सिक्युरिटीज, एएफएस/एचएफटी वर्गाखाली वर्गीकृत करण्याचे बँकेने ठरविल्यास, अशा सिक्युरिटीज त्यानंतर एचटीएम वर्गाखाली नेण्यास/हलविण्यास परवानगी दिली जाणार नाही आणि एएफएस/एचएफटी पोर्टफोलियोमध्ये, टीएलटीआरओ योजनेखाली खरेदी केलेल्या सिक्युरिटीज दाखविण्यास व वेगळ्याने दर्शविण्यास पुरेसे रेकॉर्ड ठेवले जावे. ह्याशिवाय, मूल्यांकनावर असलेल्यांसह, एएफएस/एचएफटी खाली वर्गीकृत केलेल्या सिक्युरिटीजना लागु असलेले सर्व विनियम अशा विहित सिक्युरिटीजनाही लागु असतील.
प्रश्न 6 : टीएलटीआरओ योजनेखाली मिळालेला निधी, अटीनुसार असलेल्या/विहित कालावधीमध्ये, विहित सिक्युरिटीजमध्ये वापरण्यास/गुंतविण्यास बँक असमर्थ ठरल्यास काय होईल?
उत्तर : टीएलटीआरओ योजनेखाली मिळविलेल्या निधीचा वापर करण्यास/गुंतविण्यास बँकांना आधीच पुरेसा वेळ दिलेला असतो. मार्च 27, 2020 रोजी करण्यात आलेल्या टीएलटीआरओच्या प्रथम हप्त्यात निधी मिळविला असलेल्या बँकांना, विहित सिक्युरिटीजमध्ये गुंतवणुक करण्यास 30 कामकाजाचे दिवसांपर्यंतचा अवधी देण्याचे आता ठरविण्यात आले आहे. तथापि, एखादी बँक विहित केलेल्या कालावधीत निधी गुंतविण्यास/वापरण्यास असमर्थ ठरल्यास, ह्या न वापरलेल्या निधीवरील व्याज दर, तो निधी विना-वापर राहिलेल्या दिवसांसाठी, प्रचलित रेपो रेट अधिक 200 बीपीएस एवढा वाढेल. परिपक्वतेच्या वेळी नियमित व्याजासह हे वाढीव व्याजही द्यावे लागेल.
प्रश्न 7 : टीएलटीआरओ योजनेखाली, विहित पात्र संलेख, प्रायमरी मार्केटमधून पन्नास टक्के व उरलेले पन्नास टक्के सेकंडरी मार्केट मधून मिळविण्याचे असतात. ही मर्यादा प्रायमरी व सेकंडरी मार्केट दरम्यान फंजीबल आहे काय ?
उत्तर : प्रायमरी मार्केटमध्ये टीएलआरओ खाली मिळविलेला निधी, मिळविलेल्या रकमेच्या पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक असू शकत नाही. वरील अटी व्यतिरिक्त, प्रायमरी व सेकंडरी मार्केट दरम्यान वापर/गुंतवणुक करण्याबाबत फंजीबल आहेत.
टीएलटीआरओ 2.0 संबंधित एफएक्यु
प्रश्न 8 : टीएलटीआरओ 2.0 योजनेखाली मिळालेला निधी, अटीनुसार असलेल्या/विहित कालावधीमध्ये, विहित सिक्युरिटीजमध्ये वापरण्यास/गुंतविण्यास बँक असमर्थ ठरल्यास काय होईल?
उत्तर : बँकांकडून मिळालेला फीडबॅक व कोविड-9 मुळे झालेला खंड ह्यावर आधारित ठरविण्यात आले आहे की, टीएलटीआरओ 2.0 ह्या योजनेखाली निधीचा वापर/गुंतवणुक करण्यासाठीचा कालावधी, ती योजना कार्यान्वित झाल्याच्या तारखेपासून 30 कामकाजाच्या दिवसांच्या ऐवजी 45 कामकाजाचे दिवस करण्यात यावा. ह्या विस्तारित कालावधी दरम्यान वापरले न गेलेल्या निधींवर, ते निधी न वापरण्यात आलेल्या दिवसांसाठी, प्रचलित रेपो रेट अधिक 200 बीपीएस व्याज आकारले जाईल. परिपक्वतेच्या वेळी नियमित व्याजाबरोबर हे वाढीव व्याजही प्रदान करावे लागेल.
प्रश्न 9 : टीएलटीआरओ 2.0 योजनेखाली, विहित पात्र संलेख, प्रायमरी मार्केटमधून पन्नास टक्के व उरलेले पन्नास टक्के सेकंडरी मार्केट मधून मिळविण्याचे असतात. ही मर्यादा प्रायमरी व सेकंडरी मार्केट दरम्यान फंजीबल आहे काय ?
उत्तर : बँकांना गुंतवणुकींमध्ये लवचिकता देण्यासाठी, टीएलटीआरओ 2.0 खाली मिळविलेल्या निधीसाठी ही अट लागु नाही.
प्रश्न 10 : एप्रिल 15, 2020 रोजी चौथा टीएलटीआरओ घोषित करताना रिझर्व्ह बँकेने सांगितले होते की, एखाद्या संस्थेने किंवा संस्थेच्या गटाने, तिला टीएलटीआरओ खाली मिळालेल्या वाटपामधून, त्या संस्थेने किंवा संस्थेंच्या गटाने दिलेल्या सिक्युरिटीजमध्ये, एखादी बँक गुंतवणुक करु शकत असलेली कमाल रक्कम 10 टक्क्यांपर्यंतच असेल. एप्रिल 15, 2020 पूर्वीच्या टीएलटीआरओला ही अट लागु होते काय ? टीएलटीआरओ 2.0 खाली गुंतवणुक केलेल्या निधीसाठी ही अट लागु असेल काय ?
उत्तर : ही अट केवळ एप्रिल 17, 2020 रोजी सुरु केलेल्या चौथ्या टीएलटीआरओलाच लागु आहे. एप्रिल 17, 2020 पूर्वी सुरु केलेल्या टीएलटीआरओला ती लागु नाही. टीएलटीआरओ 2.0 ला देखील ती लागु नाही.
प्रश्न 11 : प्राधान्य क्षेत्रातील उद्दिष्टे/पोट उद्दिष्टे ठरविण्यासाठी, टीएलटीआरओ निधीमधून प्राप्त केलेल्या व एचटीएम वर्गात ठेवलेल्या विहित सिक्युरिटीज, समायोजित बँक कर्ज (एएनबीसी) चे गणन करण्यास समाविष्ट करता येतील काय ?
उत्तर : टीएलटीआरओ 2.0 अधिसूचित केले असलेल्या, एप्रिल 17, 2020 रोजीच्या वृत्तपत्र निवेदन 2237/2019-20 अनुसार, ह्या योजनेखाली मिळविलेल्या एकूण निधीच्या किमान 50% निधी, रु.500 कोटी व त्यापेक्षा कमी आकाराच्या छोट्या एनबीएफसींनी दिलेल्या विहित सिक्युरिटीजमध्ये, रु.500 कोटी ते रु.5000 कोटी आकार असलेल्या मध्यम आकाराच्या एनबीएफसी आणि एमएफआयमध्ये गुंतविला/वापरला जावा. ह्याचा उद्देश म्हणजे, ह्या लघु व मध्यम आकाराच्या संस्थांना, मार्केटमध्ये प्रवेश करण्याबाबत येऊ शकणारा तरलता ताण आणि/किंवा अडचणी कमी करणे. ह्या संस्थांच्या विहित सिक्युरिटीज मधील बँकांच्या गुंतवणुकींना प्रोत्साहित करण्यासाठी असे ठरविण्यात आले आहे की, प्राधान्य क्षेत्रातील उद्दिष्टे/पोट उद्दिष्टे ठरविण्यासाठी, समायोजित अन्नेतर (नॉन फूड) बँक कर्ज (एएनबीसी) काढण्यासाठी, एचटीएम वर्गात ठेवलेल्या अशा सिक्युरिटीजचे दर्शनी मूल्य बँक वगळू शकते. ही सूट केवळ टीएलटीआरओ 2.0 खाली मिळविलेल्या निधींना लागु आहे.
प्रश्न 12 : टीएलटीआरओ वरील एप्रिल 17, 2020 रोजीच्या वृत्तपत्र निवेदनाच्या परिच्छेद 1 अनुसार, टीएलटीआरओ 2.0 चे उद्दिष्ट म्हणजे, एनबीएफसी व एमएफआय ह्यासह, लघु व मध्यम आकाराच्या कॉर्पोरेट संस्थांना तरलता वाहिनी उपलब्ध करुन देणे. तथापि, परिच्छेद 2 मध्ये सांगण्यात आले आहे की, टीएलटीआरओ 2.0 खाली मिळविलेले निधी, बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या (एनबीएफसी) व एमएफआय ह्यांच्या इनवेस्टमेंट ग्रेड बाँड्स, कमर्शियल पेपर्स (सीपी) आणि अपरिवर्तनीय डिबेंचर्समध्ये (एनसीडी) गुंतविणे/वापरणे आवश्यक आहे. टीएलटीआरओ 2.0 ची विद्यमान सोडत केवळ एनबीएफसी व एमएफआय साठीच आहे काय ?
उत्तर : टीएलटीआरओ 2.0 खाली प्राप्त केलेले निधी, एप्रिल 17, 2020 रोजीच्या वृत्तपत्र निवेदनात दिल्यानुसार, बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या (एनबीएफसी) आणि एमएफआय ह्यांच्या इनवेस्टमेंट ग्रेड बाँड्स कमर्शियल पेपर्स (सीपी) आणि अपरिवर्तनीय रोखे (एनसीडी) मध्ये गुंतविणे/वापरणे आवश्यक आहे.
टीएलटीआरओ/टीएलटीआरओ 2.0 व्यवहार उलट करणे/टॅप टीएलटीआरओ संबंधीचे एफएक्यु
प्रश्न 13 : टीएलटीआरओ/टीएलटीआरओ 2.0 खाली मिळविलेल्या निधीची परतफेड करण्याचा पर्याय बँकेने निवडल्यास, ह्या निधीचा वापर करुन बँकेने केलेल्या गुंतवणुकींना, एचटीएम पोर्टफोलियोखाली समाविष्ट करण्यासाठी, परवानगी असलेल्या, एकूण गुंतवणुकीच्या 25% पेक्षा त्या जास्त असल्या तरीही, हेल्ड टु मॅच्युरिटी (एचटीएम) खाली वर्गीकरण करणे सुरु ठेवण्याची परवानगी असेल काय ?
उत्तर : ऑक्टोबर 28, 2020 पर्यंत, बँका, वरील परतफेड पर्याय निवडण्यासाठीची त्यांची विनंती सादर करु शकतात. टीएलटीआरओ/टीएलटीआरओ 2.0 खाली मिळविलेल्या निधीची परतफेड केल्यावर, संबंधित सिक्युरिटीजना एचटीएम वर्गातून हलविले जाईल. ह्या टीएलटीआरओ/टीएलटीआरओ 2.0 चे एचटीएममधून हलविणे जाणे हे, लेखा-वर्षाच्या सुरुवातीस परवानगी असलेल्या निधी हलविण्याच्या व्यतिरिक्त असेल व ते, महापरिपत्रक - बँकांद्वारे इनवेस्टमेंट पोर्टफोलियोचे वर्गीकरण, मूल्यांकन व ऑपरेशन साठीचे प्रुडेंशियल नॉर्म्स दिनांक जुलै 1, 2015 मधील मार्गदर्शक तत्वांचे अनुसरण करण्याच्या अटीवर असेल. ज्यांच्या विरुध्द निधीची परतफेड केली जात आहे अशा टीएलटीआरओ/टीएलटीआरओ 2.0 खालील गुंतवणुकींना, लार्ज एक्सपोझर फ्रेमवर्क (एलईएफ) खाली गणल्या जाण्यास, आणि प्राधान्य क्षेत्र उद्दिष्टे/पोट उद्दिष्टे ठरविण्यासाठी अॅडजस्टेड नॉन-फूड बँक क्रेडिट (एएनबीसी) काढण्यास सूट मिळणार नाही.
प्रश्न 14 : ह्या ऑन टॅप टीएलटीआरओ योजनेखाली, बँकांनी, आरबीआयकडून आधी कर्ज घेऊन त्यानंतर पात्र असलेल्या अॅसेट्सखाली वाटप करणे आवश्यक आहे काय किंवा अन्यथा बँका आधी पात्र असलेले अॅसेट्स निर्माण करुन त्यानंतर मार्च 31, 2021 नंतर निधी मिळवू शकतात ?
उत्तर : बँका ह्यापैकी कोणताही एक पर्याय घेऊ शकतात. तथापि त्या बँकेने केलेली विनंती अर्ज केलेल्या तारखेस उपलब्ध असलेल्या निधीवर अवलंबून असेल - म्हणजे, रु.1,00,000 कोटींची एकूण रक्कम आधीच मिळविली असल्यास निधीची हमी देता येणार नाही. |