(मे 5, 2020)
(1) पीओएस टर्मिनल्सवर रोख रक्कम काढण्यासाठी कोणत्या प्रकारच्या कार्डांना परवानगी आहे ?
उत्तर :- पीओएस टर्मिनलमध्ये रोख रक्कम काढण्याच्या सुविधेखाली कार्ड धारक, त्यांची डेबिट कार्डे व भारतामधील बँकांनी दिलेली ओपन सिस्टिम प्रिपेड कार्डे वापरु शकतात. तथापि, ह्या सुविधेखाली क्रेडिट कार्डांचा वापर करता येऊ शकत नाही. पीओएस टर्मिनलमध्ये, युनायटेड पेमेंट इंटरफेस (युपीआय), तसेच प्रधान मंत्री जन धन योजना (पीएमजेडीवाय) खात्यांबरोबर दिलेल्या ओव्हरड्रफ्ट सुविधेशी जोडणी असलेल्या इलेक्ट्रॉनिक कार्डांचा उपयोग करुनही रोख रक्कम काढता येऊ शकते.
(2) ह्या सुविधेखाली काढण्याच्या रोख रकमेवर काही मर्यादा आहे काय ?
उत्तर :- होय. ह्या सुविधेखाली टायर 3 ते टायर 6 केंद्रांमध्ये एखादा कार्डधारक प्रति दिन, प्रति कार्ड रु.2,000/- पर्यंतची रोख रक्कम काढू शकतो. टायर 1 व टायर 2 केंद्रांमध्ये ही निकासी मर्यादा प्रति दिन, प्रति कार्ड रु.1,000/- आहे.
(3) ही सुविधा मिळविण्यासाठीचे आकार कोणते ?
उत्तर :- रोख रक्कम काढण्यावरील आकार (असल्यास) ते व्यवहाराच्या रकमेच्या 1% पेक्षा अधिक असणार नाहीत.
(4) ही सुविधा सर्व व्यापारी आस्थापनांमध्ये उपलब्ध आहे काय ? एखाद्या व्यापारी पीओएसमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे काय हे मला कसे कळेल ?
उत्तर :- नाही. ही सुविधा अॅक्वायरर बँकांकडून (म्हणजे पीओएस टर्मिनल्स स्थापन करणा-या बँका) ड्यु डिलिजन्स प्रक्रिया केल्यानंतर, त्यांनी नेमलेल्या व्यापारी आस्थापनांमध्ये उपलब्ध केली जाते. ह्या नेमलेल्या व्यापारी आस्थापनांनी, ही सुविधा उपलब्ध असल्याबाबत व त्या बाबतचे ग्राहकाने देय आकार (असल्यास) स्पष्टपणे निर्देशित/प्रदर्शित करणे आवश्यक आहे.
(5) एखाद्या नेमण्यात आलेल्या व्यापारी आस्थापनेमध्ये इतर बँकांनी ठेवलेल्या (मला कार्ड देणारी बँक व्यतिरिक्त) पीओएस टर्मिनलचा वापर करुन रोख रक्कम काढण्यास परवानगी आहे काय ?
उत्तर :- होय. ह्या सुविधेखाली, कार्ड देणारी बँक व अॅक्वायरिज बँक तीच असो किंवा नसो, नेमलेल्या व्यापारी आस्थापनांमध्ये रोख रक्कम काढता येऊ शकते.
(6) ही सुविधा मिळविण्यासाठी, त्या व्यापारी आस्थापनेमधून कार्ड धारकाने काही मालवस्तु/सेवा विकत घेणे सक्तीचे/अपरिहार्य आहे काय ?
उत्तर :- नाही. कार्ड धारकाने खरेदी केली असो किंवा नसो तरीही ही सुविधा उपलब्ध आहे.
(7) पीओएस टर्मिनलमधून रोख रक्कम काढल्यास त्यासाठी पावती दिली जाईल काय ?
उत्तर :- होय. पीओएस टर्मिनलने निर्माण केलेली छापील पावती, व्यापा-याने देणे आवश्यक आहे. ही सुविधा, मालवस्तु विकत घेण्यासह घेतली असल्यास निर्माण केलेल्या पावतीवर, काढलेली रोख रक्कम वेगळ्याने निर्देशित केली जाईल.
(8) ह्या सुविधेबाबतची तक्रार कोठे दाखल करता येते ?
उत्तर :- कार्ड धारक त्याची/तिची तक्रार त्याच्या/तिच्या कार्ड देणाराकडे दाखल करु शकतो. ठरलेल्या कालावधीत कार्ड देणाराने प्रतिसाद न दिल्यास किंवा मिळालेले उत्तर समाधानकारक नसल्यास, कार्ड धारक, ती तक्रार बँकिंग लोकपाल योजना/डिजिटल व्यवहारांसाठी लोकपाल योजनाखाली दाखल करु शकतो.
(9) पीओएस टर्मिनल्समध्ये ही सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी, अॅक्वायार बँकेला भारतीय रिझर्व बँकेकडून (आरबीआय) एखादी परवानगी घ्यावी लागते काय ?
उत्तर :- नाही. अॅक्वायरर बँका (स्थानिक क्षेत्र बँका सोडून इतर) त्यांच्या संचालक मंडळाच्या मंजुरीवर आधारित, पीओएस टर्मिनल्समध्ये रोख निकासी उपलब्ध करु शकतात. स्थानिक क्षेत्रीय बँकांना मात्र ही सुविधा देण्यासाठी आरबीआयची मंजुरी घेणे आवश्यक आहे.
(10) ह्या सुविधेबाबत अधिक माहिती कुठे मिळेल ?
उत्तर :- ह्या सुविधेबाबतची अधिक माहिती आरबीआयने दिलेल्या पुढील परिपत्रकात मिळू शकेल.
डीपीएसएस.सीओ.पीडी.क्र.147/02.14.003/2009-10 दिनांक जुलै 22, 2009,
डीपीएसएस.सीओ.पीडी.क्र.563/02.14.003/2013-14 दिनांक सप्टेंबर 5, 2013,
डीपीएसएस.सीओ.पीडी.क्र.449/02.14.003/2015-16 दिनांक ऑगस्ट 27, 2015,
डीपीएसएस.सीओ.पीडी.क्र.501/02.14.003/2019-20 दिनांक ऑगस्ट 29, 2019,
आणि डीपीएसएस.सीओ.पीडी.क्र.1465/02.14.003/2019-20 दिनांक जानेवारी 31, 2020.
हे एफएक्यु, भारतीय रिझर्व्ह बँकेने (या पुढे ‘बँक’ म्हणून संबोधले जाईल) माहिती व सर्वसाधारण मार्गदर्शनासाठी दिले आहे. ह्यांच्या आधारावर केलेल्या कृती आणि/किंवा निर्णय ह्यासाठी बँक जबाबदार असणार नाही. स्पष्टीकरणे किंवा अर्थ ह्यासाठी, रिझर्व्ह बँकेने व सरकारने वेळोवेळी दिलेल्या संबंधित परिपत्रकांचे व अधिसूचनांचे मार्गदर्शन घेण्याची विनंती वाचकाला करण्यात येत आहे. |