(1) एटीएस म्हणजे काय ?
एटीएस ही भारतीय रिझर्व बँकेच्या (आरबीआय) सार्वजनिक वेबसाईटवर टाकण्यात आलेली, अर्जांचा मागोवा घेणारी एक प्रणाली असून जनतेने आरबीआयकडे वैय्यक्तिक अर्ज सादर करण्यासाठी व त्यानंतर तिची वासलात/निर्णय होईपर्यंत त्या अर्जाच्या स्थितीचा मागोवा घेण्यासाठी ती विकसित करण्यात आली आहे.
(2) अर्ज म्हणजे काय ?
एखादा अर्ज हा, जनतेमधील लोक आरबीआयमधील कोणत्याही विभागाकडे, ज्याच्यामार्फत अर्ज/विनंती करु शकतात असा कोणताही अर्ज (ज्याबाबत सादर करण्याची रीत इत्यादी संबंधाने विशिष्ट सूचना दिल्या गेल्या आहेत असे अर्ज सोडून) असू शकतो.
(3) एटीएसमध्ये प्रवेश कसा मिळवता येऊ शकतो ?
आरबीआयच्या http://www.rbi.org.in. ह्या वेबसाईटवर एटीएससाठीची लिंक देण्यात आली आहे.
(4) हा अर्ज कुणाकडे जातो/मिळतो ?
अर्जदाराने एटीएसमार्फत अर्ज सादर करतेवेळी त्याने/तिने निवडलेला विभाग/कार्यालय तो अर्ज स्वीकारते.
(5) एटीएसचे कार्य कसे चालते ?
(1) प्रथमच उपयोग करणाराने त्याचा/तिचा ई-मेल आयडी एटीएसमार्फत पंजीकृत करावा.
(2) ह्या प्रणालीद्वारे निर्माण केलेला एक पासवर्ड अर्जदाराच्या ई-मेल आयडीकडे पाठविला जाईल.
(3) त्यानंतर, अर्जदार लॉग इन करुन त्याचा/तिचा अर्ज पाठवू शकतो व त्याचा मागोवा घेऊ शकतो.
(4) एटीएसमार्फत अर्ज सादर केल्याबरोबर ह्या प्रणालीद्वारा एक एकमेव (युनिक) अर्ज क्रमांक निर्माण केला जाऊन तो अर्जदाराकडे पाठविला जातो.
(5) त्या अर्जाची वासलात लावली गेल्यावर किंवा तो एका कार्यालयातून/विभागातून/कक्षातून दुसरीकडे पाठवला गेल्यावर, ह्या प्रणालीद्वारे आपोआपच एक ई-मेल पाठविला जातो.
(6) हा एटीएस-अर्ज, अन्य एखाद्या कार्यालयाकडे/विभागाकडे/कक्षाकडे, हस्तांतरित करता येऊ शकतो काय ?
होय. जेथे हा अर्ज सुरुवातीला सादर केला आहे त्या मूळ कार्यालयाची/विभागाची माहिती आणि तो ज्या कार्यालयाकडे/विभागाकडे/कक्षाकडे पाठविण्यात आला आहे त्याची माहिती, अर्जदाराला ताबडतोब मिळेल. ही माहिती, ‘माय अॅप्लिकेशन’ खाली, एटीएसमार्फत पडताळता येईल. त्यात संपूर्ण इतिहास/कारवाई दर्शविली जाईल.
(7) अर्ज दुस-याच एखाद्या कार्यालयाकडे/विभागाकडे हस्तांतरित झाल्यास काय ?
हा अर्ज आपोआपच, स्वीकारर्कत्या कार्यालयात/विभागात आवक केला जाऊन, त्या विभागाच्या प्रशासकाला मार्क केला जातो.
(8) अशा अर्जाबरोबर एखादे जोडपत्र (अॅटॅचमेंट) पाठविता येते काय ?
होय. अर्जाबरोबर एक किंवा अधिक कागदपत्रे अपलोड करता येऊ शकतात. तथापि प्रत्येक दस्त 1 एमबीपेक्षा मोठे नसावे.
(9) आरबीआयच्या काऊंटरवर प्रत्यक्ष सादर केलेल्या किंवा पोस्टाने पाठविलेल्या अर्जाचा मागोवा एटीएसमार्फत घेता येऊ शकतो काय ?
होय, आरबीआयच्या काऊंटरवर प्रत्यक्ष सादर केलेल्या किंवा पोस्ट/कुरियर मार्फत मिळालेले सर्व अर्ज /पत्रांसाठी एटीएस उपलब्ध आहे. मात्र त्यासाठी कागदपत्रात वैध ईमेल आयडी दिलेला असावा. अशा सर्व अर्जांची पोच व त्यांची वासलात, त्या अर्जदाराला ईमेल ने कळविण्यात येईल.
ह्याशिवाय, अशा अर्जाची स्थितीही एटीएस नंबर व अर्जदाराच्या वैध ई-मेल आयडीवर पाठविलेल्या पासवर्डमार्फत समजून येते. |