आरबीआय/2013-14/437
एपी.(डीआयआर सिरीज) परिपत्रक क्र.87
जानेवारी 9, 2014
प्रति,
विदेशी मुद्रेत व्यापार करणा-या सर्व प्राधिकृत बँका
महोदय/महोदया
भारतामधील निवासी व्यक्तींनी ठेवलेले निवासी बँक खाते
संयुक्त धारण - उदारीकरण
प्राधिकृत डीलर (एडी) बँकांचे लक्ष, एपी (डीआयआर) परिपत्रक क्र.12 दि. सप्टेंबर 15, 2011 कडे वेधण्यात येत आहे. ह्यानुसार भारतात निवासी असलेल्या व्यक्तींना, त्यांच्या निवासी बचत बँक खात्यांमध्ये, आधीचा किंवा उत्तरजीवीत धर्तीवर, अनिवासी असलेल्या जवळच्या नातेवाईकांना (कंपनीज् अधिनियम, 1956 च्या कलम 6 मध्ये व्याख्या केल्यानुसार नातेवाईकांना), संयुक्त धारक म्हणून समाविष्ट करण्याची परवानगी दिली होती. ह्या सूचनांच्या अनुसार, असे अनिवासी भारतीय जवळचे नातेवाईक, निवासी खातेधारकाच्या जीवन कालात ते खाते चालविण्यास पात्र नाहीत.
(2) रिझर्व बँकेकडे अनेक प्रातिनिधिक निवेदने आली आहेत की, खाते चालविण्यास सोयीस्कर ठरावे ह्यासाठी, फेमा अधिसूचना क्र. 5, दि. मे 3, 2000 च्या विनियम 2 (6) मध्ये व्याख्या केलेल्या अनिवासी भारतीयांना, दोन्हीपैकी एक किंवा उत्तरजीवीत ह्या धर्तीवर अशी खाती चालविता यावीत. त्यानुसार, पुनरावलोकन केल्यानंतर, असे ठरविण्यात आले की, पुढील अटींवर. विद्यमान/नवीन निवासी बँक खात्यांमध्ये, एडी बँका, एखाद्या एनआरआय जवळच्या नातेवाईकाला (कंपनीज् अधिनियम 1956 च्या कलम 6 मध्ये व्याख्या केलेल्या), त्या निवासी खातेदाराबरोबर, दोन्हीपैकी एक किंवा उत्तरजीवीत धर्तीवर, संयुक्त खातेदार म्हणून समाविष्ट करु शकतात.
(अ) असे खाते, सर्व कामांसाठी, निवासी बँक खाते म्हणूनच समजले जाईल आणि निवासी बँक खात्याला लागु असलेली सर्व विनियम त्याला लागु होतील.
(ब) एनआरआयच्या जवळच्या नातलगाकडील चेक्स, संलेख, प्रेषणे, रोकड, कार्ड किंवा अन्य उत्पन्न, ह्या खात्यात जमा होण्यास पात्र नसेल.
(क) एनआरआयचा जवळचा नातेवाईक हे खाते, केवळ निवासी व्यक्तीच्यावतीने देशांतर्गत प्रदानासाठीच चालवील; स्वतःसाठी लाभार्थी हितसंबंधांसाठी नाही.
(ड) एनआरयचा जवळचा नातलग जेव्हा, अशा खात्यामध्ये एकापेक्षा अधिक निवासी व्यक्तीचा संयुक्त धारक असेल तेथे, एनआरआयचा तो जवळचा नातलग हा, त्या सर्व निवासी बँक खातेदारांचा जवळचा नातलग असावा.
(ई) एखाद्या आकस्मिक प्रसंगामुळे, अनिवासी खातेधारक अशा खात्याचा उत्तरजिवित झाल्यास, विद्यमान विनियमांनुसार, ते खाते, अनिवासी सर्वसाधारण रुपये (एनआरओ) खाते म्हणून वर्गीकृत होईल.
(फ) ते खाते, एनआरओ खाते म्हणून वर्गीकृत करुन घेण्याबाबत एडी बँकेला सांगण्याची जबाबदारी, त्या खातेदारावरच असेल आणि एनआरओ खात्याला लागु होणारे सर्व विनियम, त्या खात्याला लागु होतील.
(ग) वरील संयुक्त खाते-धारकाची सुविधा, बचत खात्यासह सर्व प्रकारच्या निवासी खात्यांना दिली जाऊ शकते.
(3) ही सुविधा देतेवेळी एडी बँकेने, अशी सुविधा देण्याची गरज असण्याबाबत स्वतःचे समाधान करुन घ्यावे आणि त्याचबरोबर, अनिवासी खातेदाराने सही केलेले पुढील घोषणापत्र घ्यावे :
“माझ्या नावे, आणि माझा/माझी __________________ (नाते द्यावे) असलेला/ली, श्री/श्रीमती __________________ ह्यांच्या नावे असलेल्या, एसबी/एफडी/आर डी/चालु खाते क्र. ______ चा मी संयुक्त खातेदार आहे. मी येथे स्वीकार करतो की, मी, वरील खात्यात असलेली रक्कम, विदेशी मुद्रा व्यवस्थापन अधिनियम (फेमा) 1999 च्या तरतुदींच्या, त्याखाली केलेल्या नियमांचा/विनियमांचा आणि रिझर्व बँकेने वेळोवेळी दिलेल्या संबंधित परिपत्रक/सूचनांचा भंग होईल अशा कोणत्याही व्यवहारासाठी करणार नाही. ह्याशिवाय मी स्वीकार करतो की, फेमा 1999 किंवा त्याखाली केलेल्या नियमांचा/विनियमांचा भंग करणारा व्यवहार केला गेल्यास, त्यासाठी मी जबाबदार असेन. माझ्या अनिवासी/निवासी। दर्जामध्ये बदल झाल्यास मी माझ्या बँकेला कळवीन.”
(4) प्राधिकृत डीलर वर्ग 1 बँकांनी, ह्या परिपत्रकातील मजकुर त्यांच्या ग्राहकांच्या नजरेस आणावा.
(5) ह्या परिपत्रकातील निदेश, फेमा 1999 चे (1999 चा 42) कलम 10 (4), आणि कलम 11 (1) खाली देण्यात येत असून, इतर कोणत्याही कायद्यानुसार आवश्यक असलेल्या परवानग्या/मंजुरीच्या विपरीत नाहीत.
आपला
(रुद्र नारायण कार)
मुख्य प्रभारी महाव्यवस्थापक |