आरबीआय/2013-14/442
संदर्भ डीबीओडी. क्र.आरईटी.बीसी /83/12.06.097/2013-14
जानेवारी 10, 2014
सर्व अनुसूचित वाणिज्य बँका
महोदय,
डेवलपमेंट क्रेडिट बँक च्या नावात, भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या सेकंड शेड्युलमध्ये, डीसीपी बँक लि. असा बदल करणे.
येथे सांगण्यात येत आहे की, डिसेंबर 28, 2013 च्या भारतीय राजपत्रात (भाग 3, कलम 4) प्रसिध्द केल्याप्रमाणे व अधिसूचना डीबीओडी.पीएसबीडी क्र.10131/16.01.132/2013-14 दि. नोव्हेंबर 25, 2013 अन्वये ऑक्टोबर 24, 2013 पासून, “डेवलपमेंट क्रेडिट बँक लि.”चे नाव, भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या सेकंड शेड्युलमध्ये, “डीसीपी बँक लि.”असे बदलण्यात आले आहे.
आपली,
(सुजाता लाल)
महाव्यवस्थापक |