आरबीआय/2013-14/489
संदर्भ आरपीसीडी.सीओ.आरआरबी.आरसीबी.बीसी.क्र.87/03.05.33/2013-14
फेब्रुवारी 11, 2014
सर्व प्रादेशिक ग्रामीण बँका/
राज्य व केंद्र सहकारी बँका
महोदय/महोदया,
एफसीएनआर (बी) ठेवींवरील व्याजदर
कृपया आमचे परिपत्रक आरपीसीडी.सीओ.आरआरबी.बीसी.क्र.63/03.05.33/2013-14 आणि परिपत्रक आरपीसीडी.आरसीबी.बीसी.डीआयआर क्र.69/07.51.014/2013-14 दि. डिसेंबर 2, 2013 चा संदर्भ घ्यावा. त्यात आम्ही अनुक्रमे, प्रादेशिक ग्रामीण बँका (आरआरबी) व राज्य/केंद्रीय सहकारी बँकांना (एसटीसीबी/सीसीबी) सांगितले होते की, एक वर्ष ते तीन वर्षांपेक्षा कमी आणि तीन वर्षे ते पाच वर्षे परिपक्वता कालाच्या एफसीएनआर (बी) ठेवींवरील व्याजदर मर्यादांमध्ये परिपत्रक परिपत्रक आरपीसीडी.सीओ.आरआरबी.बीसी.क्र. 22/03.05.33/2013-14 दि. ऑगस्ट 19, 2013 अन्वये आरआरबींसाठी विहित व परिपत्रक आरपीसीडी.आरसीबी.बीसी.डीआयआर क्र.69/07.51.014/2013-14 दि. ऑगस्ट 22, 2013 अन्वये एसटीसीबी/सीसीबींसाठी (विहित) कोणताही बदल नाही - मात्र त्यांचे पुनरावलोकन केले जावे.
2) पुनरावलोकन केल्यानंतर, आणि बँकांना थोडा वेळ देण्यासाठी, असे ठरविण्यात आले आहे की, वर निर्देशित केलेल्या, ऑगस्ट 19, 2013 व ऑगस्ट 22, 2013 च्या परिपत्रकांमध्ये विहित केलेल्या एफसीएनआर (बी) ठेवींवरील व्याजदरांच्या मर्यादा, फेब्रुवारी 28, 2014 पर्यंत लागु होत राहतील. आणि पुढे दिल्याप्रमाणे, ऑगस्ट 19 व ऑगस्ट 22, 2013 पूर्वीच्या मर्यादा लागु होतील.
परिपक्वता काल |
विद्यमान |
मार्च 1, 2014 पासून |
1 वर्ष ते 3 वर्षांपेक्षा कमी |
लिबॉर/स्वॅप अधिक 200 बेसिस पॉईंट्स |
काहीही बदल नाही. |
3-5 वर्षे |
लिबॉर/स्वॅप अधिक 400 बेसिस पॉईंट्स |
लिबॉर/स्वॅप अधिक 300 बेसिस पॉईंट्स |
3) ह्याबाबतच्या वेळोवेळी सुधारित केलेल्या सूचनांमध्ये कोणताही बदल नाही.
(4) सुधारणा करणारा निदेश आरपीसीडी.सीओ.आरआरबी.आरसीबी.बीसी.क्र.88/03.05.33/2013-14 दि. फेब्रुवारी 11, 2014 सोबत जोडला आहे.
आपला,
(ए. उद्गाता)
प्रधान मुख्य महाव्यवस्थापक
आरपीसीडी.सीओ.आरआरबी.आरसीबी.डीआयआर.क्र.88/03.05.33/2013-14
फेब्रुवारी 11, 2014
एफसीएनआर (बी) ठेवींवरील व्याजदर
बँकिंग रेग्युलेशन अधिनियम, 1949 च्या कलम 35 ए ने दिलेल्या अधिकाराचा वापर करुन, आणि एफसीएनआर (बी) ठेवींवरील व्याजदरांचे निर्नियमन वरील निदेश, आरपीसीडी.सीओ.आरआरबी.डीआयआर.क्र.64 /03.05.33/2013-14. आणि आरपीसीडी.आरसीबी.बीसी.डीआयआर.क्र.69/07.51.014/2013-14-दि. डिसेंबर 2, 2013 मधील बदलांनुसार, तसेच जनहिताच्या दृष्टीने असे करणे आवश्यक असण्याबाबत समाधान झाल्याने, रिझर्व बँक येथे निदेश देत आहे की, आरआरबींसाठी असलेला निदेश आरपीसीडी.सीओ.आरआरबी.डीआयआर.क्र.21/03.05.33/2013-14 -दि. ऑगस्ट 19, 2013 व एसटीसीबी/सीसीबीसाठी असलेला निदेश आरपीसीडी.आरसीबी.बीसी.डीआयआर.क्र. 27/07.51.014/2013-14 -दि. ऑगस्ट 22, 2013 मध्ये दिलेल्या सूचना, फेब्रुवारी 28, 2013 पर्यंत लागु होणे सुरुच राहील. मार्च 01, 2014 पासून मार्च 1, 2014 पासून, व्याजदरावरील मर्यादा, आरआरबींसाठी ऑगस्ट 19, 2013 पूर्वीच्या स्थितीवर, तर एसटीसीबी/सीसीबींसाठी ती मर्यादा ऑगस्ट 22, 2013 पूर्वीच्या स्थितीवर असेल. म्हणजेच, एनआरई ठेवींवर बँकांनी देऊ केलेले व्याजदर, देशांतर्गत अशा समतुल्य रुपये ठेवींवर, त्या बँका देत असलेल्या व्याजदरांपेक्षा अधिक असू शकत नाहीत .
परिपक्वता काल |
विद्यमान |
मार्च 1, 2014 पासून |
1 वर्ष ते 3 वर्षांपेक्षा कमी |
लिबॉर/स्वॅप अधिक 200 बेसिस पॉईंट्स |
काहीही बदल नाही. |
3-5 वर्षे |
लिबॉर/स्वॅप अधिक 400 बेसिस पॉईंट्स |
लिबॉर/स्वॅप अधिक 300 बेसिस पॉईंट्स |
डॉ. (श्रीमती) दीपाली पंत जोशी
कार्यकारी संचालक. |