आरबीआय/2013-14/509
डीसीएम(पीएलजी)क्र. जी - 19/3880/10.27.00/2013-14
मार्च 3, 2014
अध्यक्ष/व्यवस्थापकीय संचालक/मुख्य कार्यकारी अधिकारी
सर्व अनुसूचित वाणिज्य बँका
प्राथमिक (नागरी) सहकारी बँका/आरआरबी
महोदय/महोदया,
2005 पूर्वी दिल्या गेलेल्या बँक नोटांच्या सर्व मालिका मागे घेतल्या जाणे
कृपया वरील विषयावरील आमचे परिपत्रक डीसीएम(पीएलजी)क्र. जी-17/3231/10.27.00/2013-14 दि. जानेवारी 23, 2014 चा संदर्भ घ्यावा. त्यानंतर जानेवारी 24, 2014 रोजी वृत्तपत्रात एक निवेदनही देण्यात आले होते (प्रत सोबत जोडली आहे).
(2) ह्या बाबीचे पुनरावलोकन केल्यावर ठरविण्यात आले की, 2005 पूर्वीच्या बँक नोटा बदलून देण्याची तारीख, जानेवारी 1, 2015 पर्यंत वाढविली जावी. ह्या सूचना, मार्च 03, 2014 रोजी दिलेल्या एका वृत्तपत्र निवेदनात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. (प्रत सोबत जोडली आहे)
(3) जनतेला कोणत्याही प्रकारे त्रास न दिला जाता ह्या नोटा त्यांच्या संपूर्ण मूल्याने बदलून देण्यासाठी आपणाला सांगण्यात येत आहे. ह्या नोटांचे कायदेशीर चलन कायम राहील आणि कोणत्याही व्यवहारासाठी/प्रदानांसाठी जनता त्यांचा उपयोग करणे सुरुच ठेवू शकेल.
(4) त्यानुसार, जनतेला ह्या नोटा बदलून देण्याबाबत आपल्या सर्व शाखांना सुयोग्य सूचना द्याव्यात व 2005 पूर्वीच्या पालिकांमधील नोटांचे पुनर्-प्रदान करणे बंद करावे. तसेच ह्या नोटा तुमच्या काऊंटर/एटीएमवरुन दिल्या जाणार नाहीत ह्याची खात्री करुन घेतली जावी. जानेवारी 23, 2014 च्या संदर्भित परिपत्रकातील परिच्छेद 3 मध्ये दिलेल्या, 2005 पूर्व मालिकांमधील बँक नोटा बदलण्याबाबतच्या कार्यरीतीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
(5) आपल्या मार्गदर्शनासाठी, करावयाच्या व न करावयाच्या बाबींची यादी सोबत दिली आहे.
(6) कृपया पोच द्यावी.
आपला,
(बी.पी. विजयेंद्र)
प्रधान मुख्य महाव्यवस्थापक.
सोबत : 3 पृष्ठे
हे अवश्य करावे
(1) बँकांनी जनतेला जाणीव करुन द्यावी की 2005 पूर्वीच्या नोटा ह्या एक कायदेशीर चलन म्हणून असणे सुरुच राहील. अर्ध नागरी/ग्रामीण क्षेत्रांमध्ये बँकांनी, नोटा बदलून देण्यासाठीचे मेळे आयोजित करावेत.
(2) 2005 पूर्वीच्या मालिकांमधील सर्व मूल्यांच्या नोटा बदलणे आवश्यक आहे.
(3) बँकांच्या सर्व शाखांनी जनतेकडून ह्या नोटा मुक्तपणे स्वीकाराव्यात व बदलून द्याव्यात - मग तो ग्राहक असो किंवा नसो.
(4) बँक शाखांमध्ये, नोटा बदलून देण्याची प्रक्रिया लगेच सुरु करण्यात यावी आणि जनतेच्या सोयीनुसार केली जावी.
(5) नोटा बदलून देण्याचे काम निःशुल्क केले जावे.
(6) ग्राहकाला तसे वाटत असल्यास अशा नोटांचे मूल्य त्याच्या खात्यात जमा केले जावे.
(7) अशा नोटांचे देय मूल्य, आरबीआयच्या नोट रिफंड नियम, 2009 अनुसार असेल.
हे करु नये
(1) जनतेपैकी कोणीही, बदलून देण्यासाठी आणलेल्या नोटांच्या संख्येवर बँकेने निर्बंध घालू नयेत.
(2) बँकांनी त्यांच्या काऊंटरवर किंवा एटीएमद्वारे, 2005 पूर्वीच्या नोटा देऊ नयेत.
(3) करन्सी चेस्ट शाखांनी, त्यांच्याशी जोडलेल्या शाखांनी दिलेल्या 2005 पूर्व नोटा नाकारु नयेत. |