आरबीआय/2013-14/579
युबीडी बीपीडी(पीसीबी) सीआयआर क्र.56/13.04.00/2013-14
मे 5, 2014
सर्व प्राथमिक (नागरी) सहकारी बँकांचे
मुख्य कार्यकारी अधिकारी
महोदय,
व्याज कर अधिनियम 1974 ग्राहकांकडून गोळा करणे.
कृपया वरील विषयावरील आमचे परिपत्रक क्र. युबीडी बीपीडी(पीसीबी) सीआयआर क्र.18/13.04.00/2008-09 दि. सप्टेंबर 22, 2008 चा संदर्भ घ्यावा.
(2) 2005 च्या लेखी याचिके (दिवाणी) वरील सर्वोच्च न्यायालय आदेश दि. फेब्रुआरी 21, 2014 वरुन असे दिसून येते की, ऑक्टोबर 1991 व मार्च 1997 दरम्यान अस्तित्वात असलेल्या, व एप्रिल 2004 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या तारखेपूर्वी, दुस-या बँकेत/वित्तीय संस्थेत विलीन केल्या गेलेल्या, किंवा नंतर विलीन झालेल्या कर्ज संस्थांच्या बाबतीत, हस्तांतरित झालेल्या बँकांनी प्रत्येकी रु. 50 लाख देणे, तसेच, हस्तांतरण करणा-या बँकांनी कर्जे व अग्रिम राशी वरील व्याज-उत्पन्नाचे राऊंडिंग ऑफ करतेवेळी जमा केलेली अतिरिक्त रक्कम, ट्रस्ट फंडमध्ये जमा करणे आवश्यक आहे.
(3) फेब्रुवारी 21, 2014 रोजीचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश विचारात घेता, युसीबींना सांगण्यात येते की, त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुयोग्य कारवाई करावी आणि आरबीआयच्या संबंधित प्रादेशिक कार्यालयाला त्याबाबतची स्थिती कळवावी.
आपला
(पी.के.अरोरा)
महाव्यवस्थापक |