आरबीआय/2013-14/581
डीबीओडी. क्र. एलईजी बीसी108/09.07.005/2013-14
मे 6, 2014,
सर्व अनुसूचित वाणिज्य बँका,
(आरआरबी सोडून)
महोदय/महोदया,
अल्पवयीन व्यक्तींच्या नावे बँक खाते उघडणे
कृपया आमचे परिपत्रक डीबीओडी.क्र.एलईजी बीसी 158/सी 90(एच)76 दि. डिसेंबर 29, 1976 चा संदर्भ घ्यावा. त्यात बँकांना सांगण्यात आले होते की त्यांनी, आईच्या पालकत्वासह अल्पवयीन व्यक्तींसाठी खाती (स्थिर व बचत ठेवी खाती) उघडण्यास परवानगी द्यावी. मात्र सुरक्षेचा उपाय म्हणून, पालकासह उघडलेल्या खात्यातून शिल्लकपेक्षा जास्त रक्कम काढली जाऊ नये आणि त्यात सदैव जमा (क्रेडिट) असेल अशा त्या खात्यावरील कार्यकृती असाव्यात. आईच्या पालकत्वासह अल्पवयीन व्यक्तींचे खाते उघडण्यासंबंधाने आवर्ती ठेवींनाही परवानगी दिली जाण्याबाबतचे आमचे परिपत्रक डीबीओडी. क्र. एलईजी बीसी 19/सी.90(एच)-89, दि. सप्टेंबर 20, 1989 चाही संदर्भ कृपया घेतला जावा.
(2) ह्याशिवाय वित्तीय समावेशनाच्या उद्देशाला प्रोत्साहन देण्यासाठी, आणि अल्पवयीन व्यक्तींसाठी खाती उघडण्या व चालविण्यामध्ये एकसमानता येण्यासाठी, बँकांना पुढीलप्रमाणे सांगण्यात येत आहे :
-
कोणत्याही वयाची अल्पवयीन व्यक्ती त्याच्या/तिच्या नैसर्गिक किंवा कायद्याने नेमलेल्या पालकाबरोबर बचत/स्थिर/आवर्ती बँक ठेवी खाते उघडू शकते.
-
10 वर्षेपेक्षा अधिक वयाची अल्पवयीन व्यक्तीला तिला तसे वाटल्यास, बचत बँक खाते स्वतंत्रपणे उघडण्यास व चालविण्यास परवानगी दिली जावी. तथापि, बँकांनी, त्यांच्या जोखीम व्यवस्थापन प्रणालींचा विचार करुन, अशा अल्पवयीनांना स्वतंत्रपणे खाते चालविण्याबाबत वय व रक्कम बाबतच्या मर्यादा ठरवाव्यात. अल्पवयीनांद्वारे खाती उघडण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे बँकांनीच ठरवावीत.
-
वयस्क झाल्यावर, पूर्वीच्या अल्पवयीनाने, त्याच्या/तिच्या खात्यामधील शिल्लकेला दुजोरा द्यावा आणि ते खाते नैसर्गिक पालक/कायदेशीर पालकाद्वारे चालविले जात असल्यास, पूर्वीच्या अल्पवयीकडून नवीन कार्यकारी सूचना व नवीन नमुना सह्या मिळवून त्या सर्व कार्यकालीन कृतींसाठी रेकॉर्डवर ठेवाव्यात.
(3) इंटरनेट बँकिंग, एटीएम/डेबिट कार्ड, चेकबुक सुविधा इत्यादि अतिरिक्त बँकिंग सुविधा देण्यास स्वतंत्र आहेत, मात्र, अशा अल्पवयीनांच्या खात्यातून शिलकेपेक्षा जास्त रक्कम काढली जात नाही व त्यात सदैव जमा (क्रेडिट) शिल्लक राहील ह्याबाबत सावधानता ठेवली जावी.
आपला,
(राजेश वर्मा)
मुख्य महाव्यवस्थापक |