आरबीआय/2012-13/598
डीबीओडी.क्र.एलईजी.बीसी.113/09.07.005/2013-14
मे 21, 2014
सर्व अनुसूचित वाणिज्य बँका
(आरआरबी सोडून)
महोदय/महोदया,
अपंगत्व असलेल्या व्यक्तींना, लाभ घेण्यायोग्य
बँक शाखा/एटीएम असण्याची गरज
कृपया आमचे परिपत्रक डीबीओडी.क्र.एलईजी.बीसी.123/09.07.005/2008-09 दि. एप्रिल 13, 2009 चा संदर्भ घ्यावा. ह्यात बँकांना सांगण्यात आले होते की, त्यांनी इतर बाबींसह सर्व विद्यमान व भावी एटीएम्समध्ये उतार (रँप्स) उपलब्ध करुन द्यावेत आणि नवीन स्थापन केलेल्या एटीएम्समधील किमान एक तृतीयांश एटीएम्स हे ब्रेल कीपॅड्स असलेले व बोलणारे एटीएम्स असावेत.
2. अपंगत्व असलेल्या व्यक्तींद्वारे दैनंदिन बँक व्यवहार करण्यासाठी बँक शाखा व एटीएम्सकडे सुलभतेने जाता येण्याबाबत, आम्हाला जनतेकडून, भारत सरकार कडून व अन्य ठिकाणांकडून अनेक सूचना येत आहेत. आम्ही अशा सूचनांचे परीक्षण केले असून वरील परिपत्रकात सांगितल्याप्रमाणे, वरील चेअर्स वापरणा-या/अपंगत्व असलेल्या व्यक्तींना सुलभतेने येता यावे ह्यासाठी, विद्यमान असलेल्या सर्व एटीएम्स/भविष्यातील एटीएम्सजवळ रँप्स उपलब्ध करण्यासाठी बँकांनी आवश्यक ती पाऊले उचलावीत. व्हीलचेअर वापरणा-यांना एटीएमच्या उंचीमुळे अडचण येऊ नये ह्याबाबत उपाय/व्यवस्था करण्याची काळजी घेतली जावी. तथापि, जेथे अशा रँप-सुविधा देणे (जमीनीवर कायमची बसवलेली किंवा अन्यथा) शक्य नसेल तेथे तसे न करण्याची कारणे नोंदून, संबंधित एटीएम किंवा शाखेत ती प्रदर्शित केली जावीत.
3. अपंगत्व असलेल्या व्यक्ती/व्हील चेअर वापरणा-यांना बँकेत प्रवेश करुन त्यांचे व्यवहार विना अडचण करता यावेत ह्यासाठी, शक्य असेल तेथे, बँक शाखांच्या प्रवेशद्वाराजवळ रँप्स उपलब्ध करुन देण्यासह बँकांनी योग्य ती पाऊले उचलावीत. ह्याबाबत केलेली प्रगती बँकांनी नियतकालिकतेने, त्यांच्या संचालक मंडळाच्या संबंधित ग्राहक सेवा समितीला कळवावी व त्याचे अनुपालन करावे.
4. ह्याशिवाय, आमच्या नजरेस आले आहे की, आमच्या वरील परिपत्रकानुसार, काही बँकांनी स्थापन केलेल्या नवीन एटीएम्सपैकी किमान एक तृतीयांश एटीएम्स हे बोलणारे व ब्रेल की-पॅड्स असलेले नाहीत. ह्यासाठी, येथे पुनश्च सांगण्यात येते की, जुलै 1, 2014 पासून स्थापन केलेले सर्व नवीन एटीएम्स हे, बँकांनी, बोलणारे व ब्रेल की-पॅड्स असलेले करावेत. विद्यमान असलेल्या सर्व एटीएम्सचे बोलणारे व ब्रेल की-पॅड्स असलेल्या एटीएम्समध्ये रुपांतर करण्याची योजना (रोड मॅप) बँकांनी तयार करावी आणि संचालक मंडळाच्या ग्राहक सेवा समितीने त्याचे वेळोवेळी पुनरावलोकन करावे.
5. ह्याशिवाय, अधु दृष्टि असलेल्यांना त्यांचे बँक व्यवहार सुलभतेने करता येण्यासाठी, सर्व बँक शाखांमध्ये, बृहदर्शक भिंगे उपलब्ध केली जावीत. अपंगत्व असलेल्या व्यक्तींसाठी असलेल्या अन्य सुविधा व बृहदर्शक भिंगाची उपलब्धता ह्याबाबत, शाखांनी, एका ठळक जागी एक नोटिस प्रदर्शित करावी.
आपला
(राजेश वर्मा)
मुख्य महाव्यवस्थापक. |