आरबीआय/2015-16/162
डीसीएम (एफएनव्हीडी) क्र. 776/16.01.05/2015-16
ऑगस्ट 27, 2015
अध्यक्ष/व्यवस्थापकीय संचालक/
मुख्य कार्यकारी अधिकारी,
सर्व बँका
महोदय/महोदया,
खोट्या नोटा ओळखणे
कृपया ‘खोट्या नोटा ओळखणे’ व त्याबाबत रिपोर्ट पाठविणे’ वरील आमचे परिपत्रक डीसीएम (एफएनव्हीडी) क्र.5840/16.01.05/2012-13 जून 27, 2013 चा संदर्भ घ्यावा. खोट्या नोटा ओळखण्याच्या रीतींचे, सरकारशी सल्लामसलत करुन पुनरावलोकन करण्यात आले असून असे दिसून आले आहे की, खोट्या नोटांबाबत अहवाल पाठविण्यामध्ये व त्याबाबत बँकांनी ठेवावयाच्या रेकॉर्डमध्ये काही सुधारणा करणे आवश्यक आहे. त्यानुसार, सूचनांमधील बदल खालीलप्रमाणे करण्यात आले आहेत.
(2) शोधणे/ओळखणे
(1) काऊंटरवर
काऊंटरवर सादर केलेल्या बँक नोटा त्यांच्या खरेपणाबाबत तपासल्या जाव्यात आणि त्यातील खोट्या/नकली ठरविण्यात आलेल्या नोटांवर “ खोटी नोट ” असा शिक्का मारण्यात यावा व त्या नोटा जोडपत्र 1 मध्ये दिल्याप्रमाणे जप्त केल्या जाव्यात. जप्त केलेली प्रत्येक नोट एका वेगळ्या रजिस्टरमध्ये सत्यांकनाखाली रेकॉर्ड केली जाईल.
(2) बँक ऑफिस/करन्सी चेस्टमध्ये एक गठ्ठा आलेल्या नोटा.
थेट बँक ऑफिसमध्ये/करन्सी चेस्टमध्ये, गठ्ठ्याने नोटा सादर करणा-यांकडून आलेल्या नोटांच्या बाबतीत वरील 2 (1) प्रमाणे कार्यरीतीचे अवलंबन करावे.
(3) एखाद्या बँक शाखेच्या किंवा ट्रेझरीच्या काऊंटरवर सादर केलेली एखादी नोट, खोटी/नकली असल्याचे आढळल्यास, वरील परिच्छेद 2 मध्ये दिल्याप्रमाणे तिच्यावर शिक्का मारुन, त्यानंतर, (जोडपत्र 2 मध्ये दिलेल्या) नमुन्यात तिची पावती देणे आवश्यक आहे. धावत्या अनुक्रमांकाच्या ह्या पावतीवर रोखपाल व ग्राहकांनी सत्यांकन करावे. जनतेच्या माहितीसाठी, अशा अर्थाची नोटिस, कार्यालयात/शाखांमध्ये ठळकपणे प्रदर्शित केली जावी. अशी नोट सादर करणाराची सही करण्याची इच्छा नसल्यासही अशी पावती दिली जावी.
(4) काऊंटरवर किंवा बँक ऑफिस/करन्सी चेस्टमध्ये मिळालेल्या खोट्या नोटांबाबत ग्राहकाच्या खात्यात क्रेडिट दाखविले जाऊ नये.
(5) खोट्या नोटा ओळखण्याच्या प्रणालीमध्ये बँकांद्वारे केलेल्या बदल/सुधारणा विचारात घेता, खोट्या नोटा न ओळखता आल्याबाबतची विद्यमान भरपाई व दंड ह्यामध्ये केलेल्या पुढील बदलांची नोंद घ्यावी.
5 (1) भरपाई
शोधण्यात व कळविण्यात आलेल्या खोट्या नोटांच्या दर्शनी (नोशनल) मूल्याच्या 25%एवढी बँकांसाठीची भरपाई, आणि बँकांच्या खोट्या नोटा दक्षता कक्षाद्वारे भरपाईसाठी केलेले दावे रद्द बातल करण्यात/काढून घेण्यात आले आहेत.
5 (2) दंड
पुढील बाबतीत, खोट्या नोटांच्या दर्शनी मूल्याच्या 100% दंड आणि ह्याशिवाय, अशा नोटांच्या दर्शनी मूल्याच्या हानीची वसुली आकारली जाईल.
(अ) बँकेने केलेल्या खराब/मळक्या नोटांच्या प्रेषणामध्ये खोट्या नोटा आढळल्यास (ब) आरबीआयद्वारे केलेल्या परीक्षण/ऑडिट दरम्यान, बँकेच्या करन्सी चेस्ट बॅलन्समध्ये खोट्या नोटा आढळल्यास
(6) काऊंटरवर व एटीएमच्या टॉप अपवर देण्यापूर्वी नोटांची तपासणी, पोलिस व इतर प्राधिकरणांना कळविणे, पायाभूत सोयी, इत्यादि बाबी तसेच शोधण्यास साह्य करण्याच्या व प्राधिकरणांबरोबर समन्वय साधण्याच्या इतर सर्व सूचना पूर्वीप्रमाणेच राहतील.
(7) ह्या सूचना ताबडतोब जारी होतील. –
आपली
(उमा शंकर)
प्रधान मुख्य महाव्यवस्थापक
सोबत - वरीलप्रमाणे. |