Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
����� >> +?vɺ��S�x�� - Display
Note : To obtain an aligned printout please download the (60.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 01/09/2015
आरटीजीएसच्या टाईम विंडोमधील बदल

आरबीआय/2015-16/168
डीपीएसएस(सीओ)आरटीजीएस क्र. 492/04.04.002/2015-16

सप्टेंबर 1, 2015

आरटीजीएसमध्ये भाग घेणा-या बँकांचे अध्यक्ष/
व्यवस्थापकीय संचालक/मुख्य कार्यकारी अधिकारी

महोदय/महोदया,

आरटीजीएसच्या टाईम विंडोमधील बदल

कृपया, भारतीय रिझर्व बँकेने, ऑगस्ट 28, 2015 रोजी दिलेल्या, ‘सप्टेंबर 1, 2015 पासून  दुस-या व चैाथ्या शनिवारी बँकांची रजा :- कामकाजाच्या शनिवारीही आरबीआय तिच्या आधार-सेवा देणार’ ह्यावरील, वृत्तपत्र निवेदन क्र. 2015-2016/528 चा संदर्भ घ्यावा.

(2) त्यानुसार, दुस-या व चैाथ्या शनिवारी, संपूर्ण दिवस, आरटीजीएस कार्यान्वित असणार नाही, परंतु कामकाजाच्या शनिवारी ती संपूर्ण दिवस कार्यान्वित असेल.  दुस-या व चैाथ्या शनिवारी मूल्याधिष्ठित तारीख असलेल्या भविष्यातील/भावी मूल्याधिष्ठित तारखेने व्यवहारांची प्रक्रिया आरटीजीएसखाली केली जाणार नाही.

(3) 1 सप्टेंबर, 2015 पासून जारी होणारी आरटीजीएस टाईम-विंडो खालीलप्रमाणे असेल.

अनुक्रमांक टाईम इव्हेंट दुसरा व चैाथा शनिवार सोडून शनिवारांसह नित्यनियमित दिवस
(1) व्यवहारासाठी खुली सकाळी 08.00 वाजता
(2) सुरुवातीचा कट ऑफ (ग्राहकांचे व्यवहार) दुपारी 4.30
(3) अंतिम कट ऑफ (आंतर बँकीय व्यवहार) संध्याकाळी 7.45
(4 आयडीएल रिव्हर्सल संध्याकाळी 7.45 ते 8.00.
(5) दिवसाची समाप्ती संध्याकाळी 8.00. 

(4) हे परिपत्रक, प्रदान व तडजोड प्रणाली अधिनियम, 2007 च्या, कलम 10(2) खाली देण्यात येत आहे. 

(5) कृपया पोच द्यावी.

आपली

नीलिमा रामटेके
महाव्यवस्थापक

 
  © ��ɮ�i�Ҫ� ���Zɴ�� ���E�, �ɴ�� ��CE� ����v��x�

S���Mɱ��� o����ɺ��`�� +ɪ� <� 5 �� i��ɴɮ�ұ� 1024 X 768 ���Z��䱪�ք�x� +��ɴ��