Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
����� >> +?vɺ��S�x�� - Display
Note : To obtain an aligned printout please download the (132.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 04/11/2015
सार्वभैाम सुवर्ण रोखे, 2015-16 कार्यकारी मार्गदर्शक तत्वे

आरबीआय/2015-16/222
आयडीएमडी.सीडीडी.क्र.968/14.04.050/2015-16

नोव्हेंबर 4, 2015

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक,
सर्व अनुसूचित वाणिज्य बँका (आरआरबी सोडून)

महोदय/महोदया,

सार्वभैाम सुवर्ण रोखे, 2015-16 कार्यकारी मार्गदर्शक तत्वे.

कृपया भारत सरकारची अधिसूचना एफ क्र. 4(19)- डब्ल्यु अँड एम/2014 आणि सार्वभैाम सुवर्ण रोखे 2015-16 वरील आरबीआयचे परिपत्रक आयडीएमडी.सीडीडी.क्र.939/14.04.050/2015-16, दिनांक ऑक्टोबर 30, 2015 चा संदर्भ घ्यावा. ह्याबाबतचे नेहमी विचारले जाणारे प्रश्न आमच्या वेबसाईटवर (www.rbi.org.in) टाकण्यात आले. ह्याबाबतची कार्यकारी मार्गदर्शक तत्वे खाली दिली आहेत.

(1) अर्ज

निवेशकांसाठी अर्जाचे फॉर्म्स, शाखांमध्ये नित्याच्या कामकाजाच्या कालात नोव्हेंबर 5 ते 20, 2015 पर्यंत स्वीकारले जातील. आवश्यक तेथे अर्जदारांकडून संबंधित अतिरिक्त माहिती मिळविली जावी. स्वीकारणा-या कार्यालयांनी, ते अर्ज सर्व बाबतीत परिपूर्ण असल्याची खात्री करुन घ्यावी.

(2) संयुक्त धारण व नामनिर्देशन

एकापेक्षा अधिक संयुक्त धारक व नामनिर्देशित (पहिल्या धारकाचा) असण्यास परवानगी आहे. पध्दतीनुसार अर्जदारांकडून आवश्यक ती माहिती मिळविली जावी.

(3) अर्जाच्या पैशांवर व्याज

अर्जदारांना प्रदान वसुलीच्या तारखेपासून ते तडजोडीच्या तारखेपर्यंतच्या कालासाठी (म्हणजे त्यांना काहीच मिळत नसण्याचा काल) बचत खात्याच्या प्रचलित व्याज दराने व्याज दिले जाईल. स्वीकारर्कत्या बँकेमध्ये अर्जदाराचे खाते नसल्यास, त्या अर्जदाराने दिलेल्या खात्यावर इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतरण करुन व्याज जमा केले जावे.

(4) रद्द करणे

इश्यु बंद होईपर्यंत (म्हणजे नोव्हेंबर 20, 2015) अर्ज रद्द केला जाऊ शकतो. सुवर्ण रोख्यांच्या खरेदीबाबत अंशतः रद्दीकरणाबाबत परवानगी नाही. अर्ज रद्द केल्यास त्या अर्जाच्या पैशांवर कोणतेही व्याज दिले जाणार नाही.

(5) लिन मार्किंग

हे रोखे सरकारी सिक्युरिटीज असल्याने, त्यावरील लिन इत्यादि, सरकारी प्रतिभूती अधिनियम, 2006 च्या तरतुदी व त्याखाली तयार केलेल्या नियमांनुसार असेल.

(6) एजन्सी व्यवस्था

अधिसूचित वाणिज्य बँका, त्यांच्या वतीने अर्जाचे फॉर्म्स गोळा करण्यासाठी, एनबीएफसी, एनएससी एजंट्स व इतरांची नेमणुक करु शकतात. अशा संस्थांबरोबर हातमिळवणी करण्यासाठी बँका व्यवस्था ठेवू शकतात.

(7) आरबीआयच्या ई-कुबेर मार्फत प्रक्रिया

सार्वभैाम सुवर्ण रोखे, अधिसूचित वाणिज्य बँकांच्या शाखांमधून व नेमलेल्या पोस्ट ऑफिसांमधून, वर्गणीसाठी, आरबीआयच्या ई-कुबेर प्रणाली मार्फत उपलब्ध असतील. ई-कुबेरमधील प्रवेश इन्फिनेट किंवा इंटरनेट द्वारा मिळविता येऊ शकतो. स्वीकारणा-या कार्यालयांनी त्यांना मिळालेल्या वर्गणी संबंधाने डेटा एंटर करावा किंवा बल्क अपलोड करावे. अर्ज मिळाल्याबाबत ताबडतोब दुजोरा दिला जाईल.

ह्याशिवाय, स्वीकारर्कत्या कार्यालयांना त्यांचा डेटाबेस अद्यावत करता यावा ह्यासाठी, फाईन्स अपलोड करण्याबाबत एक दुजोरा देणारा स्क्रोलही उपलब्ध करुन दिला जाईल. वाटपाच्या दिवशी, (म्हणजे नोव्हेंबर 30, 2015), सर्व वर्गणीदारांसाठी धारण प्रमाणपत्रे निर्माण केली जातील. स्वीकार करणारी कार्यालये, ही प्रमाणपत्रे डाऊन लोड करुन प्रिंट घेऊ शकतात. ज्यांनी आपला ई-मेल पत्ता दिला आहे अशा निवेशकांनाही ही धारण प्रमाणपत्रे ई-मेल मार्फत पाठविली जातील. ज्यांनी आपला डि-मॅट अकाऊंट दिला आहे अशा निवेशकांना, वाटपाच्या दिवशी, त्यांच्या डि-मॅट खात्यात सिक्युरिटीज् जमा केल्या जातील.

(8) धारण प्रमाणपत्रांची छपाई

धारण प्रमाणपत्रे, ए 4 आकाराच्या 100 जीएसएम कागदावर रंगीत स्वरुपात छापणे आवश्यक आहे.

(9) सेवा व पाठपुरावा

स्वीकारणारी कार्यालये, (म्हणजे अनुसूचित वाणिज्य बँकाच्या शाखा व नेमलेली पोस्ट ऑफिसे) ग्राहकांची “मालकी” घेतील आणि रोख्यांबाबत आवश्यक त्या सेवा पुरवितील (म्हणजे, संपर्क माहिती अद्यावत करणे, मुदतपूर्व रोकडीकरणाच्या विनंती स्वीकारणे इत्यादि). हे रोखे परिपक्व होऊन त्यांचे पुनर् प्रदान केले जाईपर्यंत, स्वीकारकत्या कार्यालयांनी ते अर्ज जपून ठेवणे आवश्यक आहे.

(10) संपर्क माहिती

कोणत्याही चैाकशा/स्पष्टीकरणांसाठी पुढीलप्रमाणे ई मेल पाठवावेत:

(अ) सार्वभैाम सुवर्ण रोख्याशी संबंधित ई-मेल

(ब) आयटी संबंधित ई-मेल

आपला
(राजेंद्र कुमार)
महाव्यवस्थापक

 
  © ��ɮ�i�Ҫ� ���Zɴ�� ���E�, �ɴ�� ��CE� ����v��x�

S���Mɱ��� o����ɺ��`�� +ɪ� <� 5 �� i��ɴɮ�ұ� 1024 X 768 ���Z��䱪�ք�x� +��ɴ��