आरबीआय/2015-16/221
डीबीआर.आयबीडी बीसी.52/23.67.003/2015-16
नोव्हेंबर 3, 2015
सर्व अनुसूचित वाणिज्य बँका (आरआरबी सोडून) –
महोदय/महोदया
सुवर्ण रोकडीकरण (मोनेटायझेशन) योजना, 2015 - सुधारणा
बँकिंग विनियम अधिनियम, 1949 च्या कलम 35 (अ) ने दिलेल्या अधिकाराचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँक निदेश देत आहे की, (सुवर्ण रोकडीकरण योजना, 2015), पुढीलप्रमाणे सुधारित केले जावे :
विद्यमान उप परिच्छेद 2.1.2 (1) पुढीलप्रमाणे सुधारित केला जाईल.
“कोणत्याही एका वेळी किमान ठेव 30 ग्राम अरुपांतरित सुवर्ण (चिपा, नाणी, खडे व इतर धातु सोडून दागिने) असेल. ह्या योजनेखाली ठेवीसाठी कोणतीही कमाल मर्यादा नाही”
राजेंद्र कुमार,
मुख्य महाव्यवस्थापक |