आरबीआय/2015-16/207
डीसीबीआर.बीपीडी(पीसीबी/आरसीबी).सीआयआर.क्र.3/13.05.001/2015-16
ऑक्टोबर 15, 2015
मुख्य कार्यकारी अधिकारी - सर्व प्राथमिक (नागरी) सहकारी
बँका/राज्य/केंद्रीय सहकारी बँका (राज्य सीबी/सीसीबी)
महोदय/महोदया
सुवर्ण अलंकार/जडजवाहीराच्या तारणाविरुध्द अग्रिम राशी
कृपया आमची परिपत्रके युबीडी.सीओ.बीपीडी.पीसीबी.सीआयआर.क्र.60/13.05.001/2013, मे 09, 2014 व आरपीसीडी.आरआरबी. आरसीबी.बी.सी.क्र. 8/03.05.33/2014-15, जुलै 1, 2014 च्या परिच्छेद 3 चा संदर्भ घ्यावा. त्यात सांगण्यात आले होते की, मूल्यांकन प्रमाणभूत करण्यासाठी व कर्जदारासाठी पारदर्शकता आणण्यासाठी, तारण/गहाणवट म्हणून स्वीकारलेल्या सुवर्ण अलंकारांचे मूल्यांकन, इंडियन बुलियन अँड ज्युवेलर्स असोशिएशन लिमिटेड (पूर्वीची बाँबे बुलियन असोशिएशन (बीबीए) ने, 22 कॅरट सोन्याच्या मागील 30 दिवसांच्या सरासरी दराने केले जावे.
(2) पुनरावलोकन केल्यानंतर असे ठरविण्यात आले आहे की, सहकारी बँका देखील, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कंट्रोल बोर्ड ऑफ इंडिया द्वारा नियंत्रित असलेल्या एखाद्या कमोडिटी एक्सचेंजने प्रसिध्द केलेल्या, मागील 30 दिवसांमधील सोन्याची ऐतिहासिक स्पॉट मूल्य माहितीचा उपयोग करु शकतात.
आपली
(सुमा वर्मा)
प्रधान मुख्य महाव्यवस्थापक |