आरबीआय/2015-16/360
एफआयडीडी.जीएसएसडी.सीओ.बीसी.क्र.22/09.16.03/2015-16
एप्रिल 07, 2016
अध्यक्ष/व्यवस्थापकीय संचालक,
सर्व अनुसूचित वाणिज्य बँका.
महोदय/महोदया,
दीनदयाल अंत्योदय (डीएवाय) योजना - राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान
कृपया, राष्ट्रीय नागरी उपजीविका योजनेवरील (एनयुएलएम) आमचे महापरिपत्रक एफआयडीडी.जीएसएसडी.सीओ.बीसी.क्र.10/09.16.03/2015-16 दिनांक जुलै 30, 2015 चा संदर्भ घ्यावा.
(2) नागरी क्षेत्रात राहणा-या गरीबांसाठीच्या उपजीविका-संधी सुधारण्याचा विचार करुन, भारत सरकारच्या गृह व नागरी गरीबी निर्मूलन (युपीए विभाग) मंत्रालयाने, त्यांचे कार्यालयीन पत्र क्र. के-14011/2/2012-युपीए/एफटीएस दिनांक फेब्रुवारी 19, 2016 अन्वये, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाची व्याप्ती वाढविण्याचे ठरविले आहे. व्याप्ती वाढविलेल्या ह्या अभियानाला “दीनदयाल अंत्योदय योजना (डीएवाय) - राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान” असे नवीन नाव दिले आहे. त्यानुसार, बँकांच्या माहितीसाठी, एनयुएलएम अभियानाच्या कागदपत्रांमधील सुधारणा/बदल जोडपत्रात दिल्या आहेत
आपली,
(उमा शंकर)
मुख्य महाव्यवस्थापक
सोबत वरीलप्रमाणे
|