Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> +?vɺÉÚSÉxÉÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (101.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 21/04/2016
शंकास्पद योजनांमध्ये ठेवी ठेवण्याविरुध्द जनतेला सावध करण्याबाबत बँक शाखांमध्ये प्रसिध्दी

आरबीआय/2015-16/378
डीबीआर.क्र.एलइजी.बीसी.93/09.07.005/2015-16

एप्रिल 21, 2016

अध्यक्ष/मुख्य अधिकारी, प्रादेशिक ग्रामीण बँकांसह
सर्व अनुसूचित वाणिक्य बँका/स्थानिक क्षेत्र बँका

महोदय/महोदया,

शंकास्पद योजनांमध्ये ठेवी ठेवण्याविरुध्द जनतेला सावध
करण्याबाबत बँक शाखांमध्ये प्रसिध्दी

आपणास माहितच असेल की, अलिकडील वर्षांमध्ये, ठेवी/गुंतवणुकी इत्यादींद्वारे, निधी गोळा करण्यासाठी, निरनिराळ्या शंकास्पद योजना तयार/सुरु करुन सर्वसाधारण जनतेला फसविणा-या तत्वशून्य संस्था स्थापन केल्या गेल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. ब-याच वेळा, अशा योजना, रियल्टी, शेतमळे व इतर उत्पादांमध्ये गुंतवणुकींच्या स्वरुपात प्रायोजित केल्या जातात. तथापि, बँका ठेवींवर देत असलेल्या उत्पन्नापेक्षा बरेच मोठे उत्पन्न देऊ करण्याचा दावा करुन, अशा योजना नेहमीच भोळ्या जनतेला मोहात पाडत असतात.

(2) आरबीआयच्या नजरेस असेही आले आहे की, ग्राहकांना फोन केला जातो की त्यांनी लॉटरी/सोडत मध्ये बक्षीस मिळविले असून त्यांनी अज्ञात अशा खात्यात पैसे जमा करावेत व त्यानंतरच त्यांना बक्षीसाची रक्कम पाठविली जाईल किंवा ते सांगतील त्या खात्यात जमा केली जाईल. अशा फसव्या/खोट्या संदेशावर विश्वास ठेवून, ग्राहक आवश्यक ती रक्कम पाठवून देतात व त्याचबरोबर ह्या फसवणा-या लोकांना त्यांच्या खात्यांची माहितीही देतात.

(3) भोळ्या/निष्पाप ठेवीदारांच्या अशा योजनांना बळी पडण्यामागे, फसव्या योजना/कॉल्स बाबत सावधानतेचा आणि वित्तीय साक्षरतेचा अभाव हीच मुख्य कारणे आहेत असा आमचा विश्वास आहे. अशा घटनांचा जनतेवर आघात होण्याशिवाय, त्याचा बँकिंग क्षेत्रावरही परिणाम होतो, कारण ह्या फसव्या संस्थांनी अफरातफर केलेला पैसा, बँकिंग प्रणालीत येऊन बँकेच्या ठेवींचा पाया/आधार भक्कम होऊ शकला असता

(4) अशा शंकास्पद योजनांबाबत जनतेला सावध करण्यास आणि सुरक्षित गुंतवणुकीबाबत जनतेमध्ये वित्तीय साक्षरता वाढविण्यासाठी आरबीआय निरनिराळे उपाय करीत आली आहे. ह्या संदर्भात, वाणिज्य बँकांची विस्तृत ब्रँच नेटवर्क्स आरबीआय करीत असलेल्या प्रयत्नांना मदत करु शकतील असे वाटते.

(5) वरील बाबी विचारात घेऊन, बँका, त्यांच्या स्वतःच्या हितसंबंधांसाठी आणि जनतेच्या हिताबाबत ग्राहक शिक्षणाचा प्रयत्न म्हणून पुढील संदेश देणारे पोस्टर्स, किंवा हस्तपत्रके किंवा फ्लायर्स किंवा नोटिसा तयार करु शकतात.

  • ई-मेल/फोन/इतर माध्यम* ह्यांच्यामार्फत मिळालेल्या, न मागितलेल्या पैशांच्या ऑफर्सना कधीही प्रतिसाद देऊ नका.

  • कोणीही तुम्हाला पैसा मोफत देत नाही*.

  • उच्चतर उत्पन्न देऊ करणा-या, आकर्षक वाटणा-या योजनांमध्ये गुंतवणुक करताना सावध रहा.

  • विनियमित (नियंत्रित) नसलेल्या कंपन्यांमध्ये/संस्थांमध्ये गुंतवणुक करु नका*.

  • ऐकीव गोष्टींवर विश्वासू नका - स्वतःच तपास करा*.

  • उच्चतर उत्पन्न म्हणजे, संभाव्य संपूर्ण पैशांची हानि होण्यासह, अधिकतर जोखीमच आहे - तुम्ही किती जोखीम घेऊ शकता ते तपासा!*

  • तुमच्या पैशांची काळजी घ्या - पैसा मिळविणे कठीण असते पण गमावणे सोपे असते.

  • शंका उद्भवल्यास एखाद्या विश्वासु वित्तीय सल्लागाराचा सल्ला घ्या.
    *कोणत्याही स्पष्टीकरणासाठी www.rbi.org.in किंवा www.sebi.gov.in किंवा www.irda.gov.in ला भेट द्या.

शक्य असेल तेथे, असे संदेश ग्राहकांना सहजतेने दिसू शकतील अशा प्रकारे, बँक शाखांमध्ये (राज्याच्या भाषेमध्ये) प्रदर्शित केले जावेत किंवा वाटले जावेत. बँक शाखांमध्येच बहुसंख्य जनता येत असल्याकारणाने, असे केल्याने जनतेमध्ये ही माहिती प्रसारित होण्यास मदत होईल. ऑटोमेटेड टेलर मशीन्स किंवा बिझिनेस कॉरेस्पाँडंट पॉईंटस ह्यासारख्या, जास्त नजरेत भरणा-या जागांची निवड बँका करु शकतात. हे बँकांसाठीही लाभदायक असेल, कारण, त्याचे ग्राहक अशा फसव्या योजना/कॉल्सबाबत सावध व जागृत होतील.

(6) येथे ह्या मुद्दयावर जोर देणे आवश्यक आहे की, असे उपाय परिणामकारक होण्यासाठी, ते सातत्याने दीर्घकाळ केले जाणे आवश्यक असून, ह्याबाबत फील्ड स्टाफलाही त्याबाबत जाणीव करुन दिली जावी. शाखांमधील अधिका-यांनीही, त्यांच्या क्षेत्रातील शंकास्पद योजनांची अर्थपूर्ण माहिती (मार्केट इंटेलिजन्स) त्यांच्या प्रादेशिक कार्यालयाकडे द्यावी व त्या कार्यालयांनी ती माहिती आरबीआयच्या संबंधित प्रादेशिक कार्यालयाला कळवावी.

(7) वरील संदेशांसाठी एक समान डिझाईन तयार करण्यासाठी, आम्ही ह्या परिपत्रकाची एक प्रत, इंडियन बँक्स असोशिएशनकडेही पाठवित आहोत व ते डिझाईन स्वीकारण्याचा/छापण्याचा व नंतर प्रदर्शित करण्याचा विचार बँका करु शकतात.

आपला

(राजिंदर कुमार)
मुख्य महाव्यवस्थापक

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä