आरबीआय/2015-16/391
एफआयडीडी. क्र. एफएसडी.बीसी.24/05.05.014/2015-16
मे 5, 2016
अध्यक्ष/व्यवस्थापकीय संचालक/मुख्य कार्यकारी अधिकारी,
(सर्व अनुसूचित वाणिज्य बँका (प्रादेशिक ग्रामीण बँका सोडून)
महोदय/महोदया,
विशेष शेतकी कर्ज योजना (एसएसीपी)वरील विवरणपत्रे पाठविणे खंडित
शेतकी क्षेत्राला दिल्या जाणा-या कर्जावर देखरेख ठेवण्यासाठी व कर्जप्रवाह वाढविण्यासाठी, 1994 मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी विशेष शेतकी कर्ज योजना (एसएसीपी) सुरु करण्यात आली होती आणि ती योजना 2004 मध्ये खाजगी क्षेत्रातील बँकांमध्येही सुरु करण्यात आली होती. ह्या एसएसीपी खाली, मागील वर्षात केलेल्या कर्ज वाटपात सुमारे 25% वाढ करुन ह्या वर्षात (एप्रिल-मार्च) साध्य करण्यास स्वतःच ठरविलेली उद्दिष्टे ठरविणे बँकांसाठी आवश्यक करण्यात आले होते. प्रत्येक वर्षाच्या मार्च व सप्टेंबर अखेरीस, ह्याची अंमलबजावणीबाबतची सहामाही विवरणपत्रे आरबीआयकडे (एफआयडीडी) बँकांनी पाठविणे आवश्यक होते.
2. प्राधान्य क्षेत्र अहवालांमधून आम्हाला संबंधित माहिती मिळत असल्याकारणाने, एप्रिल 2016 पासून वरील विवरणपत्रे पाठविणे खंडित करण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यानुसार, बँकांना सांगण्यात येते की 2016-17 वर्षासाठी त्यांनी वरील विवरणपत्रे एआयफडीडी रिझर्व बँक ह्यांना पाठवू नयेत. तथापि, मार्च 2016 मध्ये संपणा-या सहामाहीसाठीची कर्ज-वाटप-विवरणपत्रे ह्या बँकेला पाठविण्यात यावीत.
3. कृपया पोच द्यावी.
आपला
(जोस जे.कत्तुर)
मुख्य महाव्यवस्थापक
|