आरबीआय/2015-16/420
एफआयडीडी.जीएसएसडी.सीओ.बीसी.क्र.26/09.01.03/2015-16
जून 09, 2016
अध्यक्ष/व्यवस्थापकीय संचालक,
सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँका
महोदय/महोदया,
राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान (एनआरएलएम) - अजीविका –
व्याज अर्थसहाय्य योजना
कृपया राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान (एनआरएलएम) खालील व्याज अर्थसहाय्य योजनेवरील मार्गदर्शक तत्वे असलेले आमचे परिपत्रक एफआयडीडी.जीएसएसडी.सीओ.बीसी.क्र.19/09.01.03/2015-16 दिनांक जानेवारी 21, 2016 चा संदर्भ घ्यावा.
ह्या योजनेतील अंशतः सुधारणा म्हणून, भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने, त्यांचे पत्रदि. मे 23, 2016 अन्वये सांगितले आहे की, ह्या योजनेवरील परिच्छेद 1.12 (जोडपत्र 3 ते 5) “कोणताही मानवी हस्तक्षेप नाही” ह्या खंडाच्या एैवजी, व्याज अर्थसहाय्य दावा प्रमाणपत्रांमध्ये, “किमान मानवी हस्तक्षेप” हा खंड टाकला जावा.
आपली,
(उमा शंकर)
मुख्य महाव्यवस्थापक
|