आरबीआय/2015-16/436
एफआयडीडी.क्र.एफएसडी.बीसी.27/05.10.001/2015-16
जून 30, 2016 अध्यक्ष/व्यवस्थापकीय संचालक/मुख्य कार्यकारी अधिकारी
(सर्व अनुसूचित वाणिज्य बँका (प्रादेशिक ग्रामीण बँका सोडून)
महोदय/महोदया,
नैसर्गिक आपत्तींमुळे ग्रस्त क्षेत्रांमध्ये बँकांद्वारे मदतीचे उपाय करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे - विमा उत्पन्नाचा उपयोग/वापर महापरिपत्रक एफआयडीडी.क्र.एफएसडी.बीसी.01/05.10.001/2015-16 दिनांक. जुलै 1, 2015 च्या परिच्छेद 6.13 अनुसार, नैसर्गिक आपत्तींमुळे ग्रस्त झालेल्या क्षेत्रातील कर्जांची पुनर् रचना करतेवेळी, बँकांनी कर्जदारांना कर्जे दिली आहेत तेथे, विमा कंपन्यांकडून देय असलेली रक्कम ‘पुनर् रचित कर्जात’ समायोजित करणे आवश्यक आहे.
(2) नैसर्गिक आपत्तींनी ग्रस्त क्षेत्रातील शेतक-यांना येणा-या अडचणींचा विचार करुन, बँकांनी त्यांच्याशी सहानुभूतीने वागून, विमा दाव्याची वाट न पाहता, व जेथे दाव्याची रक्कम मिळण्याची निश्चितता आहे तेथे कर्जाची पुनर्रचना करुन नवीन कर्ज देण्याचा विचार करावा.
आपली,
(उमा शंकर)
मुख्य महाव्यवस्थापक |