आरबीआय/2015-16/442
एफाआयडीडी.क्र.एफएसडी.बीसी.28/05.10.007/2015-16
जून 30, 2016
अध्यक्ष/व्यवस्थापकीय संचालक/मुख्य कार्यकारी अधिकारी
सर्व अनुसूचित वाणिक्य बँका (प्रादेशिक ग्रामीण बँका सोडून)
महोदय/महोदया,
पीक विमा योजनेच्या कामगिरीचे ऑडिट (लेखापरीक्षण)
पिकांचे नुकसान झाले असलेल्या शेतक-यांना मदत मिळण्यात, पीक विम्याची परिणामकारकता तपासण्यासाठी, शेतकी पीक विमा योजनेचे कामगिरी-लेखापरीक्षण, दि. कंपट्रोलर अँड ऑडिटर जनरल द्वारा करण्यात येत आहे. हे लेखा-परीक्षण, आंध्रप्रदेश, आसाम, गुजराथ, हरयाणा, हिमाचल प्रदेश, ओरिसा, महाराष्ट्र, राजस्थान आणि तेलंगणा ह्या राज्यांमध्ये, संबंधित राज्यांमधील, प्रिंसिपाल अकाऊंटर जनरल/अकाऊंटंट जनरल (ऑडिट) ह्यांच्या कार्यालयांद्वारे करण्याचे प्रायोजित केले आहे.
(2) ह्या कामगिरी-लेखापरीक्षणामध्ये, शेती सहाय्य व शेतकरी कल्याण विमा, भारतीय शेती विमा कंपनी, राज्य शेती विभाग आणि इतर संबंधित विभागांचे अभिलेखांचे (रेकॉर्ड्स) तपासणी केली जाईल. ह्याशिवाय, निरनिराळ्या बँकांच्या विमा कंपन्या, आणि सहकारी संस्था ह्यांच्या सहाय्याने, पीक विमा योजना राबविल्या जात असल्याने, पीक विमा योजना परिणामकारक रितीने राबविल्या जात होत्या की नाही, व लक्ष्य ठरलेल्या लाभार्थींना त्यांचा लाभ मिळाला होता की नाही हे समजण्यासाठी, ह्या बँका/विमा कंपन्या/सहकारी संस्था ह्यांचेही अभिलेख तपासणे आवश्यक आहे.
(3) ह्या सर्वांचा विचार करता, संबंधित राज्यांमधील, प्रिंसिपाल अकाऊंटंट जनरल/अकाऊंटंट जनरल (ऑडिट) ह्यांच्या कार्यालयांनी नेमलेल्या लेखा परीक्षण गटांना, पीक विमा योजनेसंबंधीचे तुमचे अभिलेख पाहू द्यावेत असे आपणास सांगण्यात येत आहे.
आपली
(उमा शंकर)
मुख्य महाव्यवस्थापक. |