आरबीआय/2016-17/128
डीसीएम(पीएलजी)क्र.1268/10.27.00/2016-17
नोव्हेंबर 12, 2016
अध्यक्ष/व्यवस्थापकीय संचालक/मुख्य कार्यकारी अधिकारी/
सार्वजनिक क्षेत्रातील बँका/खाजगी क्षेत्रातील बँका/
विदेशी बँका/प्रादेशिक ग्रामीण बँका/सहकारी बँका
महोदय,
विद्यमान रु.500/- व रु.1000 च्या बँक नोटांचे वैध चलन लक्षण काढून टाकणे - अहवाल व देखरेख - काऊंटर्सवर/एटीएम मधून बँक नोटा देण्याबाबत माहिती
कृपया, रु.500/- व रु.1000/- च्या विद्यमान बँक नोटांचे वैध चलन लक्षण बाद करणे - अहवाल व देखरेख वरील आमचे परिपत्रक डीसीएम(पीएलजी)क्र. 1264/10.27.00/2016-17 दि. नोव्हेंबर 11, 2016 चा संदर्भ घ्यावा.
(2) ह्याच संदर्भात ठरविण्यात आले आहे की, काऊंटर्सवरुन काढलेल्या तसेच एटीएम मधून काढलेल्या रोख रकमेचा तपशील दैनिक धर्तीवर बँकांनी देणे आवश्यक आहे. त्यानुसार, सुधारित केलेले जोडपत्र 6अ सोबत जोडले आहे. आमच्या येथे माहिती एकत्रित करण्यात मदत व्हावी ह्यासाठी आपणास विनंती करण्यात येते की, नोव्हेंबर 13, 2016 पासून, जोडपत्र 6 अ च्या व्यतिरिक्त, सोबतच्या एक्सेल फाईल मध्ये माहिती देण्यात यावी. कृपया नोंद घ्यावी की, दैनिक अहवाल मेलने पाठवावेत.
आपली विश्वासु,
(पी विजया कुमार)
मुख्य महाव्यवस्थापक
सोबत : वरील प्रमाणे
जोडपत्र 6 अ - सुधारित
रु.500/- व रु.1000/- मूल्याच्या एसबीएनची दैनिक प्राप्ती आणि खात्यांमधून काढलेली रोख रक्कम (काऊंटर्सवरुन व एटीएममधून), आरबीआय, डीसीएम, केंद्रीय कार्यालय ह्यांना ईमेल द्वारा कळविण्याचा नमुना
बँकेचे नाव :
व्यवहारांची तारीख :
मिळालेल्या एसबीएन/दिलेल्या बँक नोटांचा तपशील :
तपशील |
रु.500
(नगा मध्ये) |
रु.1000
(नगा मध्ये) |
एकूण मूल्य रु. |
रोखीने बदललेल्या एसबीएन |
|
|
|
खात्यात जमा केलेल्या एसबीएन |
|
|
|
एकूण |
|
|
|
सापडलेल्या नकली नोटा |
|
|
|
काऊंटरवर ग्राहकांना दिलेली रोख रक्कम (एसबीएनच्या अदलाबदली व्यतिरिक्त) |
रु. |
एटीएम/इतर यंत्रांमधून दिलेली रोख रक्कम |
रु. |
|