शनिवार, नोव्हेंबर 12, 2016 आणि रविवार, नोव्हेंबर 13, 2016 रोजी जनतेसाठी बँका सुरु राहणार |
आरबीआय/2016-2017/114
डीबीआर.क्र.एलईजी.बीसी.31/09.07.005/2016-17
नोव्हेंबर 09, 2016
अध्यक्ष/व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी/
सार्वजनिक क्षेत्रातील बँका/खाजगी क्षेत्रातील बँका/
विदेशी बँका/लघु वित्त बँका/प्रादेशिक ग्रामीण बँका
/स्थानिक क्षेत्रीय बँका/सर्व सहकारी बँका.
महोदय/महोदया,
शनिवार, नोव्हेंबर 12, 2016 आणि रविवार, नोव्हेंबर 13, 2016 रोजी जनतेसाठी बँका सुरु राहणार
जनतेकडून त्यांचे बँकिंग व्यवहार करण्यासाठीची अपेक्षित मोठी मागणी पूर्ण करण्यासाठी असे ठरविण्यात आले आहे की, शनिवार दि. 12 नोव्हेंबर 2016 व रविवार दि. 13 नोव्हेंबर 2016 रोजी बँका जनतेच्या व्यवहारासाठी सुरु ठेवल्या जातील. सर्व व्यवहार करण्यासाठी नोव्हेंबर 12 व 13 रोजी त्यांच्या सर्व बँक-शाखा नेहमीप्रमाणेच सुरु ठेवण्यासाठी बँकांना सांगण्यात येत आहे. ह्या दोन दिवशी बँक सेवा उपलब्ध असल्याबाबत बँकांनी योग्य ती प्रसिध्दी द्यावी.
आपला विश्वासु
(राजिंदर कुमार)
मुख्य महाव्यवस्थापक |
|