आरबीआय/2016-2017/106
डीसीएम(सीसी)क्र.1170/03.41.01/2016-17
नोव्हेंबर 02, 2016
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक/
मुख्य कार्यकारी अधिकारी,
सर्व बँका.
महोदय/महोदया
खास/विशेष एटीएम मधून रु.100 मूल्याच्या बँक नोटांचे वितरण
कृपया चलन वितरण व अदलाबदल योजना (सीडीईएस) वरील आमचे परिपत्रक डीसीएम(सीसी)जी-10/3352/03.41.01/2015-16 दिनांक, मे 5, 2016 चा संदर्भ घ्यावा.
(2) कमी मूल्याच्या बँक नोटा वितरित करणारी एटीएम्स स्थापन करण्यासाठी बँकांनी उचललेल्या पाऊलांचे पुनरावलोकन करण्यात आल्यावर दिसून आले की, रु. 100 मूल्यांच्या नोटांसह कमी मूल्याच्या बँक नोटा वितरित करण्यास एटीएम स्थापन करण्यात फारच थोड्या बँकांनी पुढाकार घेतला होता.
(3) स्वच्छ नोटा धोरण्याचा उद्देश नजरेसमोर ठेवून आणि रु.100 च्या नोटांसाठी जनतेची खरी गरज पूर्ण होण्यासाठी, फुटकळ वापरासाठी वितरण करणा-या एटीएम्समधून बँकांनी रु.100 च्या नोटांचे अधिकतर वितरण केले पाहिजे.
(4) ह्या दिशेने बँकांना प्रोत्साहन देण्यासाठी असे ठरविण्यात आले आहे की, ह्या देशातील एटीएम्सच्या 10% एटीएम्स खास रु.100 च्या नोटाच वितरित करण्यासाठीच कॅलिब्रेट करण्यासाठीचा एक पायलट प्रकल्प सुरु केला जावा. ह्यासाठी, आपणास सांगण्यात येत आहे की, ही व्यवस्था सुरु करण्यासाठी आपण आपल्या एटीएम्सची 10% एटीएम्स कनफिगर/कॅलिब्रेट करावीत.
(5) ही मशीन्स पर्याप्त संख्येने कनफिगर करण्यासाठीची प्रक्रिया गुंतागुंतीची नसल्याने, हे काम बँकांनी, ह्या परिपत्रकाच्या तारखेपासून 15 दिवसांच्या आत पूर्ण करावे आणि तसे केल्याचे कळवावे. ह्यासाठी, तुलनेने जास्त संख्या असलेल्या केंद्रात/राज्यातील शाखा, ह्या नमुन्यासाठी निवडण्याचे स्वातंत्र्य बँकांना देण्यात आले आहे. अशी एटीएम ठेवली असलेली ठिकाणे जोडपत्रात दिलेल्या नमुन्यात आम्हाला कळवावीत. दोन महिन्यानंतर ह्या पायलट प्रकल्पाबाबतचा अनुभव आपण आम्हाला कळवू शकता.
(6) कृपया पोच द्यावी –
आपली विश्वासु
(पी विजया कुमार)
मुख्य महाव्यवस्थापक
सोबत : वरील प्रमाणे.
खास एटीएममार्फत रु.100 मूल्याच्या नोटांचे वितरण
बँकेचे नाव –
अनुक्रमांक |
राज्य |
शहर/नगर/जिल्हा |
एटीएम असलेल्या जागेचा पत्ता |
|
|
|
|
|
|
|
|
(ई-मेल ने पाठवावे). |