विद्यमान रु.500 व रु.1000 च्या बँक नोटांचे वैध चलन लक्षण काढून घेणे/बाद करणे - रोख रक्कम काढण्यासाठी मर्यादा |
आरबीआय/2016-17/124
डीसीएम(पीएलजी)क्र.1256/10.27.00/2016-17
नोव्हेंबर 11, 2016
अध्यक्ष/व्यवस्थापकीय संचालक/मुख्य कार्यकारी अधिकारी/
सार्वजनिक क्षेत्रातील बँका/खाजगी क्षेत्रातील बँका/
विदेशी बँका/प्रादेशिक ग्रामीण बँका/नागरी सहकारी बँका/
राज्य सहकारी बँका
महोदय ,
विद्यमान रु.500 व रु.1000 च्या बँक नोटांचे वैध चलन लक्षण काढून घेणे/बाद करणे - रोख रक्कम काढण्यासाठी मर्यादा
कृपया आमचे परिपत्रक डीसीएम(पीएलजी)क्र.1251/10.27.00/2016-17 नोव्हेंबर 10, 2016 चा संदर्भ घ्यावा आणि ह्याबाबत पुढील अतिरिक्त सूचना पहाव्यात.
(2) सरकारी विभागांना, अपवादात्मक बाबतीत व केवळ त्या रोख रकमेची आवश्यकतेचा लेखी पुरावा दिला असल्यास, महाव्यवस्थापक व त्यापेक्षा वरिष्ठ अधिका-याला तसे योग्य वाटल्यासच, रु.10,000/- ह्या ठरविण्यात आलेल्या मर्यादेपलिकडे रोख रक्कम काढण्यास परवानगी दिली जावी.
आपली विश्वासु
(पी.विजया कुमार)
मुख्य महाव्यवस्थापक
|
|