आरबीआय/2016-17/129
डीसीएम(पीएलजी)क्र.1272 /10.27.00/2016-17
नोव्हेंबर 13, 2016
अध्यक्ष/व्यवस्थापकीय संचालक/मुख्य कार्यकारी अधिकारी/
सार्वजनिक क्षेत्रातील बँका/खाजगी क्षेत्रातील बँका/
विदेशी बँका/प्रादेशिक ग्रामीण बँका/नागरी सहकारी बँका/राज्य सहकारी बँका
महोदय,
रु.500/- व रु.1000/- च्या विद्यमान बँक नोटांचे वैध चलन लक्षण काढून घेणे – मर्यादां मध्ये सुधारणा
कृपया, वरील विषयावरील आमचे परिपत्रक क्र. डीसीएम(पीएलजी)क्र.1226/10.27.00/2016-17 दि. नोव्हेंबर 8, 2016 चा संदर्भ घ्यावा. पुनरावलोकन केल्यानंतर मर्यादांमध्ये सुधारणा करण्यात आल्या - त्या पुढीलप्रमाणे.
-
काऊंटरवर विहित बँक नोटांची अदलाबदल करण्याची मर्यादा विद्यमान रु.4,000/- वरुन रु.4,500/- करण्यात आली आहे.
-
एटीएम मधून रोख रक्कम काढण्याची मर्यादा रिकॅलिब्रेट केलेल्या एटीएम्समध्ये, विद्यमान रु.2,000/- वरुन रु.2,500/- प्रति दिवस करण्यात आली आहे. इतर एटीएम्समधून ती रि-कॅलिब्रेट केली जाईपर्यंत, रु.50 व रु.100 च्या बँक नोटा मिळणे सुरुच राहील.
-
बँक खात्यामधून प्रति सप्ताह रु.20,000/- काढण्याबाबतची मर्यादा रु.24,000/- पर्यंत वाढविण्यात आली आहे आणि प्रति दिवस रु.10,000/- काढण्याची मर्यादा आता रद्द करण्यात/काढून घेण्यात आली आहे.
(2) दर वर्षी नोव्हेंबर महिन्यात सादर करावयाच्या जीवित-प्रमाणपत्राच्या सादरीकरणाची शेवटची तारीख जानेवारी 15, 2017 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
(3) वरिष्ठ नागरिक व दिव्यांग (अपंग) व्यक्तींसाठी वेगळ्या रांगा ठेवण्याची व्यवस्था करण्यास बँकांना सांगण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, एसबीएन बदलून घेण्यासाठी आलेल्या आणि त्या खात्यात भरण्यासाठी आलेल्या लोकांसाठी वेगवेगळ्या रांगा ठेवण्यासही सांगण्यात आले आहे.
(4) बँकांना सांगण्यात येते की, बँक खात्यातून काढण्यासाठी, रोख देण्याची, बिझिनेस कॉरेस्पाँडंटांची मर्यादा रु.2,500/- पर्यंत वाढविण्यात यावी.
(5) वरील बदल ताबडतोब जारी होतील.
(6) कृपया पोच द्यावी
आपली विश्वासु,
(पी विजया कुमार)
मुख्य महाव्यवस्थापक |