आरबीआय/2016-17/130
डीसीएम(पीएलजी)क्र. 1273/10.27.00/2016-17
नोव्हेंबर 14, 2016
अध्यक्ष/व्यवस्थापकीय संचालक/मुख्य कार्यकारी अधिकारी,
सार्वजनिक क्षेत्रातील बँका/खाजगी क्षेत्रातील बँका/विदेशी बँका/
प्रादेशिक ग्रामीण बँका/नागरी सहकारी बँका/राज्य सहकारी बँका/
राज्य मध्यवर्ती सहकारी बँका
महोदय,
रु.500/- व रु.1000/- च्या विद्यमान बँक नोटांचे वैध चलन लक्षण काढून घेणे - ह्या योजनेने डीसीसीबींना लागु होणे
कृपया वरील विषयावरील आमचे परिपत्रक क्र. डीसीएम(पीएलजी)क्र.1226/10.27.00/2016-17 दि. नोव्हेंबर 8, 2016 चा संदर्भ घ्यावा. येथे स्पष्ट करण्यात येते की, राज्य मध्यवर्ती सहकारी बँका, त्यांच्या विद्यमान ग्राहकांना, त्यांच्या खात्यांमधून, नोव्हेंबर 24, 2016 पर्यंत, प्रति सप्ताह, रु.24,000/- काढण्यास परवानगी देऊ शकतात. तथापि त्यांनी विहित बँक नोटा (रु.500/- व रु.1000/-)बदलून देऊ नयेत किंवा अशा नोटा खात्यात भरण्यास परवानगी देऊ नये.
(2) सर्व बँकांना सांगण्यात येते की, त्यांनी डीसीसीबींनी ठेवलेल्या खात्यांमधून, त्यांच्या गरजेवर अवलंबून रोख रक्कम काढण्यास परवानगी द्यावी. एखाद्या डीसीसीबीला इतर कोणत्याही असलेल्या तिच्या खात्यामधून प्रति सप्ताह रु.24,000/- पर्यंत रोख रक्कम काढण्याची मर्यादा लागु नाही.
आपली विश्वासु,
(पी विजया कुमार)
मुख्य महाव्यवस्थापक |