आरबीआय/2016-17/133
डीसीएम(पीएलजी)क्र.1280/10.27.00/2016-17
नोव्हेंबर 15, 2016
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक/मुख्य कार्यकारी अधिकारी,
सार्वजनिक क्षेत्रातील बँका/खाजगी क्षेत्रातील बँका/विदेशी बँका/
प्रादेशिक ग्रामीण बँका/नागरी सहकारी बँका/राज्य सहकारी बँका
महोदय,
एसबीएनसाठी बँक शाखेत आलेल्या ग्राहकांच्या बोटाला, न पुसली जाणारी शाई लावण्यासाठी प्रमाणभूत कार्यकारी रीत (एसओपी).
कृपया वरील विषयावरील आमचे परिपत्रक क्र. डीसीएम(पीएलजी)क्र.1226/10.27.00/2016-17 दि. नोव्हेंबर 8, 2016 चा संदर्भ घ्यावा. निरनिराळ्या ठिकाणांवरुन आलेल्या प्रतिसादाच्या आधारावर, विहित बँक नोटांच्या (एसबीएन) अदलाबदली साठी एक प्रमाणभूत कार्यकारी रीत (एसओपी) असण्याची आवश्यकता भासत आहे, त्यानुसार पुढील उपाय ठेवण्यास बँकांना सांगण्यात येत आहे.
(1) एसबीएन बदलून देत असताना संबंधित बँक शाखा व पोस्ट ऑफिसे, ग्राहकाच्या उजव्या हाताच्या तर्जनीवर, न पुसली जाणारी शाई लावतील. त्यामुळे त्याने/तिने केवळ एकदाच जुन्या चलनी नोटा बदलून घेतल्या असल्याचे कळेल.
(2) ही न पुसणारी शाई, इंडियन बँक्स असोशिएशनच्या (आयबीए) सहकार्याने व आरबीआयशी सल्लामसलत करुन बँका/पोस्ट ऑफिसांना पुरविली जाईल.
(3) ही कार्यरीत सर्व प्रथम महानगरांमध्ये व त्यानंतर इतर क्षेत्रात सुरु केली जाईल.
(4) प्रत्येक बँक शाखेला प्रत्येकी 5 मिली काळी न पुसणारी शाई असलेल्या बाटल्या पुरविल्या जातील. ह्या बाटलीच्या झाकणात शाई लावण्यासाठीचा छोटा ब्रश असेल.
(5) ही न पुसणारी शाई, रोखपालाकडून किंवा बँकेने नेमलेल्या अन्य अधिका-याकडून, ग्राहकाला नोटा देण्यापूर्वी लावली जाऊ शकते. त्यामुळे नोटांची अदलाबदल केली जात असताना, शाई वाळल्यास व ती काढून टाकणे टाळण्यास काही सेकंदांचा अवधी मिळेल.
(6) जुन्या नोटा बदलून देण्यास नकार देण्यासाठीची सबब म्हणून डाव्या हाताच्या तर्जनीवर किंवा डाव्या हाताच्या कोणत्याही बोटावर शाई लावू नये.
आपली विश्वासु,
(पी विजया कुमार)
मुख्य महाव्यवस्थापक |