रु.500/- व रु.1000/- च्या विद्यमान बँक नोटांचे वैध चलन लक्षण काढून टाकणे - काऊंटर्सवरुन अदलाबदल |
आरबीआय/2016-17/139
डीसीएम(पीएलजी)क्र.1302/10.27.00/2016-17
नोव्हेंबर 17, 2016
अध्यक्ष/व्यवस्थापकीय संचालक/मुख्य कार्यकारी अधिकारी,
सार्वजनिक क्षेत्रातील बँका/खाजगी क्षेत्रातील बँका/विदेशी
बँका/प्रादेशिक ग्रामीण बँका/नागरी सहकारी बँका/राज्य सहकारी बँका
महोदय,
रु.500/- व रु.1000/- च्या विद्यमान बँक नोटांचे वैध चलन लक्षण काढून टाकणे - काऊंटर्सवरुन अदलाबदल
कृपया ह्या विषयावरील आमचे परिपत्रक डीसीएम(पीएलजी)क्र.1226/10.27.00/2016-17 दि. नोव्हेंबर 8, 2016 चा संदर्भ घ्यावा.
(2) पुनरावलोकन केल्यावर असे ठरविण्यात आले आहे की, बँकांच्या काऊंटर्सवरुन रोख एसबीएनची अदलाबदल करण्यावरील मर्यादा, नोव्हेंबर 18, 2016 पासून रु.2000/- एवढी असेल. ही सुविधा प्रति व्यक्ती एकदाच उपलब्ध असेल.
(3) कृपया पोच द्यावी.
आपली विश्वासु
(पी विजया कुमार)
मुख्य महाव्यवस्थापक |
|