Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
����� >> +?vɺ��S�x�� - Display
Note : To obtain an aligned printout please download the (119.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 18/11/2016
पॉईंट-ऑफ-सेल (पीओएस) मध्ये रोख रक्कम काढणे - निकासीच्या मर्यादा व ग्राहक शुल्क/आकार - शिथिलीकरण

आरबीआय/2016-17/140
डीपीएसएस.सीओ.पीडी.क्र.1280/02.14.003/2016-17

नोव्हेंबर 18, 2016

अध्यक्ष/व्यवस्थापकीय संचालक/मुख्य कार्यकारी अधिकारी,
सार्वजनिक क्षेत्रातील बँका/खाजगी क्षेत्रातील बँका/विदेशी
बँका/प्रादेशिक ग्रामीण बँका/नागरी सहकारी बँका/राज्य सहकारी बँका/
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, सर्व कार्ड नेटवर्क प्रोव्हायडर्स

महोदय/महोदया,

पॉईंट-ऑफ-सेल (पीओएस) मध्ये रोख रक्कम काढणे - निकासीच्या मर्यादा व ग्राहक शुल्क/आकार - शिथिलीकरण

बँकांनी, निरनिराळ्या ठिकाणांसाठी विहित केलेल्या प्रति दिन मर्यादांसह, त्यांनी दिलेल्या सर्व डेबिट कार्डे/ओपन लूप प्रिपेड कार्डे ह्यांच्यासाठी पॉईंट ऑफ सेल (पीओएस) मधून रोख रक्कम काढण्यावरील आमची परिपत्रके डीपीएसएस.सीओ.पीडी.क्र.147/02.14.003/2009-10 दि. जुलै 22, 2009, डीपीएसएस. सीओ.पीडी.क्र. 563/02.14.003/ 2013-14 दि. सप्टेंबर 5, 2013 व डीपीएसएस.सीओ.पीडी.क्र..449/02.14.003/2015-16 दि. ऑगस्ट 27, 2015 कडे आपले लक्ष वेधण्यात येत आहे.

(2) रु.500/- व रु.1000/- च्या विद्यमान बँक नोटांचे (विहित बँक नोटा - एसबीएन) वैध चलन लक्षण काढून घेतल्यानंतर, भारतीय रिझर्व बँकेने, परिपत्रक डीपीएसएस.सीओ.पीडी.क्र..1240/02.10.004/2016-2017 दि. नोव्हेंबर 14, 2016 अन्वये बँकांना सांगितले होते की, त्यांनी नोव्हेंबर 10, 2016 पासून डिसेंबर 30, 2016 पर्यंत, बचत खातेधारकांनी सर्व एटीएम्सवर केलेल्या सर्व व्यवहारांसाठीचे एटीएम आकार पुनरावलोकनाच्या अटीवर, त्यांनी लावू नयेत.

(3) ग्राहक-केंद्रित असा आणखी एक उपाय म्हणून असे ठरविण्यात आले आहे की, (1) पीओएसमध्ये (भारतामधील बँकांनी दिलेल्या डेबिट कार्डांसाठी व ओपन सिस्टिम प्रिपेड कार्डांसाठी) रोख रक्कम काढावयाची मर्यादा, ही सुविधा ठेवली असलेल्या सर्व व्यापारी आस्थापनांसाठी व सर्व केंद्रांमध्ये (टायर 1 ते 6) एकसमानतेने, रु.2000/- प्रति दिवस करण्यात आली आहे आणि (2) ह्यासाठीचे ग्राहक आकार (असल्यास) अशा व्यवहारांसाठी लावण्यात येणार नाहीत.

(4) वरील निदेश ह्या परिपत्रकाच्या तारखेपासून जारी होतील व पुनरावलोकनाच्या अटीवर, डिसेंबर 30, 2016 पर्यंत लागु असतील.

(5) ह्या बाबतच्या सर्व विद्यमान सूचनांमध्ये कोणताही बदल नाही.

(6) हे निदेश, प्रदान व तडजोड प्रणाली अधिनियम, 2007 च्या (2007 चा 51) कलम 18 सह वाचित कलम 10(2) खाली देण्यात येत आहेत.

आपली विश्वासु

(नंदा दवे)
मुख्य महाव्यवस्थापक

 
  © ��ɮ�i�Ҫ� ���Zɴ�� ���E�, �ɴ�� ��CE� ����v��x�

S���Mɱ��� o����ɺ��`�� +ɪ� <� 5 �� i��ɴɮ�ұ� 1024 X 768 ���Z��䱪�ք�x� +��ɴ��