Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> +?vɺÉÚSÉxÉÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (110.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 21/11/2016
विहित बँक नोटांचे वैध चलन लक्षण काढून टाकणे –
रोख रक्कम निकासीच्या मर्यादा

आरबीआय/2016-17/142
डीसीएम(पीएलजी)क्र.1317/10.27.00/2016-17

नोव्हेंबर 21, 2016

अध्यक्ष/व्यवस्थापकीय संचालक/मुख्य कार्यकारी अधिकारी,
सार्वजनिक क्षेत्रातील बँका/खाजगी क्षेत्रातील बँका/विदेशी बँका/
प्रादेशिक ग्रामीण बँका/नागरी सहकारी बँका/राज्य सहकारी बँका/
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका

महोदय,

विहित बँक नोटांचे वैध चलन लक्षण काढून टाकणे –
रोख रक्कम निकासीच्या मर्यादा

कृपया आमचे परिपत्रक क्र. डीसीएम्(पीएलजी)क्र .1274/10.27.00/2016-17 दि. नोव्हेंबर 14, 2016 च्या परिच्छेद (1) - अतिरिक्त सुविधाचा संदर्भ घ्यावा. त्यानुसार, चालु खातेधारकांना (तीन महिने किंवा त्याहून अधिक काळ कार्यान्वित असलेल्या चालु खात्यांना लागु) रु.50,000 पर्यंतची रोख रक्कम काढण्यास परवानगी देण्यात आली होती. पुनरावलोकन केल्यावर, ही सुविधा, ओव्हरड्राफ्ट व कॅश क्रेडिट खात्यांनाही देण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यानुसार, गेले तीन महिने किंवा त्यापेक्षा अधिक काळ कार्यान्वित असलेल्या चालु/ओव्हरड्राफ्ट/कॅश क्रेडिट खात्यांनाही आता प्रति सप्ताह रु.50,000 पर्यंत रोखीने काढता येतील. तथापि, प्रति सप्ताह निकासीची ही वाढविलेली मर्यादा व्यक्तिगत ओव्हरड्राफ्ट खात्यांना लागु असणार नाही.

(2) अशा रोख निकासीसाठी मुख्यत्वेकरुन रु.2000 च्या नोटाच दिल्या जाव्यात.

आपली विश्वासु,

(सुमन रे)
महाव्यवस्थापक

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä