आरबीआय/2016-17/145
डीसीएम(पीएलजी) क्र.1320/10.27.00/2016-17
नोव्हेंबर 21, 2016
अध्यक्ष/व्यवस्थापकीय संचालक/मुख्य कार्यकारी अधिकारी,
सार्वजनिक क्षेत्रातील बँका/खाजगी क्षेत्रातील बँका/विदेशी
बँका/प्रादेशिक ग्रामीण बँका/नागरी सहकारी बँका/राज्य सहकारी बँका
महोदय,
रु.500/- व रु.1000/- च्या विद्यमान विहित बँक नोटांचे वैध चलन लक्षण काढून टाकणे - विवाह समारंभासाठी रोख रक्कम काढणे
कृपया वरील विषयावरील आमचे परिपत्रक क्र.डीसीएम(पीएलजी) क्र.1226/10.27.00/2016-17 दि. नोव्हेंबर 8, 2016 चा संदर्भ घ्यावा.
(2) जनतेमधील लोकांना त्यांच्या पाल्यांचे विवाह समारंभ साजरे करण्यास मदत करण्यासाठी, विवाहाशी संबंधित खर्च भागविण्यासाठी त्यांच्या खात्यातून रोख निकासीच्या उच्चतर मर्यादांना परवानगी देण्याचे ठरविण्यात आले आहे. तथापि, विवाहाचा खर्च रोख नसलेल्या रीतींनी (म्हणजे चेक/ड्राफ्ट, क्रेडिट/डेबिट कार्डे, प्रिपेड कार्डे, मोबाईल ट्रान्सफर्स, इंटरनेट बँकिंग चॅनल्स, एनईएफटी/आरटीजीएस इत्यादी) करण्यासाठी बँकांनी कुटुंबांना प्रोत्साहन द्यावे. ह्यासाठी रोख रक्कम काढतेवेळी जनतेला सांगण्यात यावे की त्यांनी केवळ रोख प्रदानेच आवश्यक आहेत अशा खर्चांसाठीच रोख रक्कम वापरावी. रोख रक्कम निकासीसाठी पुढील अटी आहेत.
(1) नोव्हेंबर 8, 2016 रोजी व्यवहार बंद होतेवेळी खात्यात असलेल्या शिल्लक जमा रकमेमधून, डिसेंबर 30, 2016 पर्यंत, बँक ठेव खात्यामधून कमाल रु.2,50,000/- काढण्यास परवानगी आहे.
(2) केवळ केवायसी निकष पूर्ण केले असलेल्या बँक खात्यांमधूनच निकासी करण्यास परवानगी आहे.
(3) विवाहाची तारीख 30 डिसेंबर 2016 किंवा त्यापूर्वीची असल्यासच वरील रकमा काढता येतील.
(4) आई किंवा वडील किंवा लग्न करणारी व्यक्ती (ह्यांच्यापैकी केवळ एकालाच) निकासी करु शकेल.
(5) निकासी करावयाची प्रायोजित रक्कम रोखीने पैसे देण्यासाठी वापरावयाची असल्याने, ज्यांना हे पैसे द्यावयाचे आहेत त्यांचे बँक खाते नसल्याचे सिध्द करावे लागेल.
(6) निकासीसाठीच्या अर्जाबरोबर पुढील कागदपत्र द्यावे लागतील.
(अ) जोडपत्रानुसार अर्ज
(ब) विवाहबाबतचा पुरावा - आमंत्रण पत्रिका, आधीच केलेल्या प्रदानांच्या पावत्यांच्या प्रति (म्हणजे
लग्नाच्या हॉलचे बुकिंग, कॅटरर्सना केलेले अग्रिम प्रदान इत्यादि).
(क) काढलेली रोख रक्कम ज्यांना द्यावयाची आहे त्यांची सविस्तर यादी आणि त्या व्यक्तींची
बँक खाती नसल्याबाबत त्या व्यक्तींनी दिलेली घोषणापत्रे. ह्या यादीमध्ये, प्रस्तावित प्रदाने
कोणत्या कामा/हेतूसाठी आहेत हे निर्देशित करावे.
(3) बँकांनी ह्या पुराव्यांचे रेकॉर्ड ठेवावे आणि तशीच गरज पडल्यास ते, पडताळणीसाठी प्राधिकृत अधिका-यांना सादर करावे.
आपली विश्वासु
(पी विजया कुमार)
मुख्य महाव्यवस्थापक
सोबत – वरीलप्रमाणे
|