आरबीआय/2016-17/147
डीसीएम(पीएलजी)क्र.1341/10.27.00/2016-17
नोव्हेंबर 22, 2016
अध्यक्ष/व्यवस्थापकीय संचालक/मुख्य कार्यकारी अधिकारी,
सार्वजनिक क्षेत्रातील बँका/खाजगी क्षेत्रातील बँका/विदेशी
बँका/प्रादेशिक ग्रामीण बँका/नागरी सहकारी बँका/राज्य सहकारी बँका
महोदय,
रु.500/- व रु.1000/- च्या विद्यमान विहित बँक नोटांचे (एसबीएन) वैध चलन लक्षण काढून टाकणे - फसवणुकीच्या रीती
आमच्या असे नजरेस आणण्यात आले आहे की, काही ठिकाणी, काही बँक शाखा अधिकारी काही खोडसाळ/दुष्कृत्ये करणा-या लोकांबरोबर हात मिळवणी करुन, रोख एसबीएन बदलून घेताना/एसबीएन खात्यात जमा करताना फसवाफसवीच्या रीती अनुसात आहेत.
(2) ह्यासाठी बँकांना सांगण्यात येते की, त्यांनी कडक नजर ठेवून अशा फसवणुकीच्या रीती ताबडतोब बंद कराव्यात आणि अशा कार्यकृती करणा-या अधिका-यांविरुध्द कडक कारवाई केली जाईल ह्याची खात्री करुन घ्यावी.
(3) बँकांनी, एसबीएन बदलून देताना तसेच अशा नोटा ग्राहकांच्या खात्यात जमा करताना पाळावयाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन केले जात असल्याची खात्री करुन घ्यावी. ह्याबाबत बँक शाखांनी पुढील गोष्टींचे सुयोग्य रेकॉर्ड ठेवणे आवश्यक आहे.
(1) नोव्हेंबर 10, 2016 पासून प्रत्येक कर्ज खातेदार किंवा ठेवखातेदार ह्यांच्या प्रत्येक खात्यामध्ये जमा केले गेलेल्या विहित बँक नोटांची मूल्य निहाय माहिती व एसबीएन नसलेल्या नोटांचे एकूण मूल्य.
(2) वॉक-इन तसेच नियमित ग्राहकांबाबत, त्यांनी बदलून घेतलेल्या एसबीएन बाबत ग्राहक निहाय व मूल्य-निहाय रेकॉर्ड.
अल्प काल आधी दिलेल्या सूचनेनंतरही हा तपशील देण्यासाठी बँकांनी तयारीत असले पाहिजे.
(4) कृपया पोच द्यावी.
आपली विश्वासु
(पी विजया कुमार)
मुख्य महाव्यवस्थापक
|