आरबीआय/2016-17/151
डीसीएम(पीएलजी)क्र.1351/10.27.00/2016-17
नोव्हेंबर 23, 2016
अध्यक्ष/व्यवस्थापकीय संचालक/मुख्य कार्यकारी अधिकारी,
सार्वजनिक क्षेत्रातील बँका/खाजगी क्षेत्रातील बँका/विदेशी
बँका/प्रादेशिक ग्रामीण बँका/नागरी सहकारी बँका/राज्य सहकारी बँका
महोदय,
लघु बचत योजनांमध्ये विहित बँक नोटा (एसबीएन) जमा करणे
कृपया रु.500/- व रु.1000/- च्या विद्यमान बँक नोटांचे वैध चलन लक्षण काढून घेणे ह्यावरील आमचे परिपत्रक डीसीएम(पीएलजी)क्र.1226/10.27.00/2016-17 दि. नोव्हेंबर 8, 2016 चा संदर्भ घ्यावा.
(2) येथे सांगण्यात येते की, भारत सरकारकडून ठरविण्यात आले आहे की, लघु बचत योजनेच्या वर्गणीदारांना, लघु बचत योजनांमध्ये एसबीएन जमा करण्यास परवानगी दिली जाऊ नये. ह्यासाठी बँकांना सांगण्यात येते की, त्यांनी लघु बचत खात्यांमध्ये एसबीएन स्वीकारणे ताबडतोब बंद करावे.
(3) कृपया पोच द्यावी.
आपली विश्वासु
(पी विजया कुमार)
मुख्य महाव्यवस्थापक |