रोख रक्कम काढणे - साप्ताहिक मर्यादा |
आरबीआय/2016-17/158
डीसीएम(पीएलजी)क्र.1424/10.27.00/2016-17
नोव्हेंबर 25, 2016
अध्यक्ष/व्यवस्थापकीय संचालक/मुख्य कार्यकारी अधिकारी,
सार्वजनिक क्षेत्रातील बँका/खाजगी क्षेत्रातील बँका/विदेशी
बँका/प्रादेशिक ग्रामीण बँका/नागरी सहकारी बँका/राज्य सहकारी बँका/
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका
महोदय,
रोख रक्कम काढणे - साप्ताहिक मर्यादा
कृपया अनुक्रमे नोव्हेंबर 13 व नोव्हेंबर 14, 2016 ची परिपत्रके डीसीएम(पीएलजी)क्र. 1272/10.27.00/2016-17 आणि 1273/10.27.00/2016-17 चा संदर्भ घ्यावा. येथे बँकांना सांगण्यात येत आहे की, त्यांनी त्यांच्या विद्यमान ग्राहकांना, प्रति सप्ताह रु.24,000/- काढण्यासाठी दिलेली परवानगी पुढील सूचना मिळेपर्यंत सुरुच ठेवावी. आमचे परिपत्रक डीसीएम(पीएलजी)क्र.1304/10.27.00/2016-17 दि. नोव्हेंबर 20, 2016 मध्ये दिलेल्या अटीनुसार एटीएम मधून केलेली निकासी ह्या मर्यादेत समाविष्ट आहे.
(2) कृपया पोच द्यावी.
आपली विश्वासु,
(सुमन रे)
महाव्यवस्थापक |
|