आरबीआय/2016-2017/94
डीबीआर.सीआयडी.बीसी.27/20.16.040/2016-17
ऑक्टोबर 20, 2016
सर्व पत संस्था,
महोदय/महोदया,
‘पंजीकरण प्रमाणपत्र’ देणे - क्रेडिट इन्फर्मेशन (कर्ज विषयक माहिती) देण्याचा
व्यवसाय करण्यासाठी एक्सपेरियन क्रेडिट इन्फर्मेशन कंपनी ऑफ
इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (ईसीआयसीआय)
कृपया, एक्सपेरियन क्रेडिट इन्फर्मेशन कंपनी ऑफ इंडिया प्रा. लि. (ईसीआयसीआय) ह्यांना ‘पंजीकरण प्रमाणपत्र’ देण्याबाबत असलेले आमचे परिपत्रक डीबीओडी क्र.डीआय.15214/20.16.042/2009-10 दिनांक मार्च 4, 2010 चा संदर्भ घ्यावा.
(2) ह्या कंपनीने तिचे कार्यालय आता दुस-या ठिकाणी हलविले आहे. त्यानुसार, आम्ही ह्या कंपनीला क्रेडिट इन्फर्मेशनचा व्यवसाय करण्यासाठीचे एक नवीन ‘पंजीकरण प्रमाणपत्र’ ऑक्टोबर 20, 2016 रोजी दिले आहे. ह्या कंपनीचा नवीन पत्ता पुढीलप्रमाणे आहे :
एक्सपेरियन क्रेडिट इन्फर्मेशन कंपनी ऑफ इंडिया प्रा. लि.,
इक्विनॉक्स बिझिनेस पार्क, 5 वा मजला,
ईस्ट विंग, टॉवर 3,
एलबीएस मार्ग,
कुर्ला (प.),
मुंबई - 400 070
आपला,
(राजिंदर कुमार)
मुख्य महाव्यवस्थापक |